शिवसेना कायम बळीराजासोबतच, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला आधार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नगरच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आले आहेत. संगमनेरच्या दिशेने जात असताना काकडी गावामध्ये ग्रामस्थांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान राखत उद्धव ठाकरे यांनी काकडी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कायम बळीराजासोबत राहणार, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पैशांबाबत विधीमंडळात आवाज उठवणार असल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दुष्काळग्रस्त भागाची पाणी करायला जात असताना शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटायची विनंती केली. यावेळी शेतकरी महिलांनी आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही असे सांगितले. दुष्काळ पडलेला आहे आम्ही शासनाच्या शासन आपल्या दारी गेलो मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही. आम्हाला तेथे साधे स्टेजवर सुद्धा बोलवले नाही. या कार्यक्रमासाठी डाम ‘डोल करून पैसे खर्च केले जातात. मात्र आम्हाला दिले जात नाही. आमच्या व्यथा सुद्धा ऐकल्या नाही, दुष्काळी परिस्थिती झालेली आहे, आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत, पाऊस पडला तर पिके उभे राहतील का? असा प्रश्न केला. त्यावर शेतकऱ्यांनी नाही म्हणून सांगत पिकाचे नुकसान झालेच आहे, असे ते म्हणाले. यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही पिकासाठी कर्ज घेतलं होतं ते परत कसे फेडायचे असे उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांनी मी येथे आश्वासन द्यायला आलेलो नाही तुम्हाला ठामपणे विश्वास देतो की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत निश्चितपणे यातून मार्ग काढू असे सांगितले. यावेळी ठाकरे यांनी मागच्या वेळेला पंचनामे झाले मात्र त्याचे पैसे अद्याप पर्यंत दिले गेले नाही, याही वर्षी दुष्काळ आहे. शासन आपल्या दारी आले मग त्यांनी काय केले असा सवालच उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारला.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

यावेळी काकडी येथील ग्रामस्थांनी आम्ही विमानतळासाठी जागा दिली मात्र आमचे अद्याप पर्यंत पैसे पूर्णपणे दिले गेले नाहीत, ते पैसे आम्हाला दिले तर आमचा प्रपंच उभा राहील, असे ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांनी या विषयासंदर्भात विधिमंडळामध्ये तसेच केंद्र सुद्धा आपण याबद्दल आवाज उठवू असे आश्वासन दिले.

संगमनेर तालुक्यामध्ये वडझरी खुर्द या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विजेची बिले वेळेवर येतात की नाही असे विचारले. त्यावर ग्रामस्थांनी आम्हाला वीजच मिळत नाही फक्त बिले मिळतात असे ते सांगितले. तुम्हाला या मोसमामध्ये किती वेळा पेरणी करावी लागली असे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले त्या वेळेला त्यांनी दुबार आम्हाला पेरणी करावी लागली असे ते म्हणाले, त्यामुळे आमचे कर्ज सुद्धा वाढले असून विमाचे पैसे देखील मिळाले नाहीत, असे एका शेतकऱ्याने सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मागच्या वेळेला पाऊस पडला त्याचा मोबदला मिळाला नाही आताही तीच परिस्थिती हा सगळा फसवा प्रकार सुरू आहे. आता रिमझिम पाऊस पडतोय लोक म्हणतील मी पावसात आलो तसे नाही. या पावसाचा तुम्हाला काही उपयोग आहे का असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना विचारला, तुम्ही जर एकरी लागवड केली तर तुम्हाला खर्च किती येतो असे त्यांनी शेतकऱ्यांना विचारल्यावर शेतकऱ्यांनी 50 हजार रुपये खर्च येतो असे सांगितले. शेतकऱ्यांनी यावेळी आम्हाला पाणी मिळत नाही ते टॅंकरने आणावे लागते त्यासाठी सुद्धा खर्च येतो, साधारणता अडीच हजार रुपये टॅंकरला लागतात तो टँकर आठ दिवस सुद्धा पुरत नाही.

राहता तालुक्यातील केलवड गावात राऊत वस्ती या ठिकाणी परिसराची पाहणी ठाकरे यांनी केली यावेळी या ठिकाणी बापू राऊत व आत्माराम गमे यासह शेतकऱ्यांचा भावना त्यांनी जाणून घेतल्या.