स्पॅनिश अभिनेत्याच्या मुलावर खुनाचा आरोप

स्पॅनिश अभिनेता रोडॉल्फो सांचो अगुइरे यांच्या मुलावर थायलंडमध्ये एका व्यक्तीची हत्या करून त्याचे तुकडे केल्याप्रकरणी खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सॅन्चो यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला आहे. त्यांची आई अभिनेत्री सिल्व्हिया ब्रॉन्चालो आहे, तर त्याचे आजोबा दिवंगत अभिनेते फेलिक्स अँजेल सांचो ग्रासिया आहेत.

29 वर्षीय डॅनियल सँचो ब्रोंचालो याने सोमवारी थायलंडच्या न्यायालयात 44 वर्षीय एडविन अरिएटा अर्टेगा, , हिच्या हत्येचा गुन्हा कबूल केला.पोलिसांना गेल्या आठवड्यात दक्षिणेकडील बेटावरील लँडफिलमध्ये अरिएटाच्या शरीराचे अवशेष सापडले. एका यूट्यूब शेफने  गेल्या गुरुवारी कोह फांगन पोलीस स्थानकात कोलंबियन शल्यचिकित्सक अरिएटा बेपत्ता असल्याची तक्रार  नोंदविली होती. कोह फांगन हे भडक पार्टीसाठी ओळखले जाते.

त्या दिवशी सकाळी कचरा गोळा करणार्‍यांनी मानवी अवशेष शोधून काढल्यानंतर डीएनए चाचण्यांद्वारे पोलिसांनी निश्चित केले की हे अवशेष अरिएटाचे आहेत. रविवारी, डॅनिअलने पोलिसांना सात ठिकाणी नेले, जिथे त्याने पीडितेच्या छिन्नविछिन्न शरीराची प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये विल्हेवाट लावली.

पोलिसांना तपासात सांचोकडे गेल्या मंगळवारी इतर गोष्टींबरोबरच चाकू, रबरचे हातमोजे आणि क्लिनिंग एजंटची एक बाटली सापडली. ज्यामुळे पोलिसांनी असा निष्कर्ष काढला की की हा खून पूर्वनियोजित होता. याप्रकरणी  त्याला जामीन नाकारण्यात आला असून  त्याला सध्या कोह सामुई बेटावरील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एरिएटाच्या उर्वरित अवशेषांचा शोध सुरू आहे