जगभरातून विशेष बातम्या

इन्फोसिस शेअरधारकांची चांदी

जून 2018 पासून अवघ्या पाच वर्षांत इन्पहसिसने आपल्या शेअरधारकांची अक्षरशः चांदी केली. या पाच वर्षांत पंपनीने शेअरधारकांना 1.1 लाख कोटी रुपये वाटले आहेत. इन्पहसिसच्या शेअरधारकांना अजूनही जास्त पैसे मिळण्याची आशा आहे. इन्पहसिसने आपल्या शेअरधारकांना लाभांश आणि बायबॅकच्या माध्यमातून हिस्सा वितरित केला. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये याची मोफत रोख रक्कम 2.8 बिलियन डॉलरवर मजबूत स्थितीत पोहोचली होती.

चारधामसाठी चार्टर्ड हेलिकॉप्टर

उत्तराखंडमध्ये 10 मेपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. परंतु यंदा पहिल्यांदाच चारधामसाठी चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चार लोक एका धामची यात्रा करू शकतील. यासाठी एका धामची यात्रा साडेतीन लाख रुपयांत करू शकतील. चारधामसाठी हेलिकॉप्टर घेतल्यास प्रति व्यक्ती 1.95 लाख एवढे भाडे मोजावे लागेल. भाडय़ात ये-जा, मुक्काम, भोजनाचा समावेश आहे. एका दिवसात परतीचे भाडे 1.05 लाख असेल.

प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटन सोडले

राजघराण्यातील वादामुळे प्रिन्स हॅरी यांनी अखेर ब्रिटन सोडले आहे. हॅरी यांनी आपला अधिकृत पत्ता ब्रिटनऐवजी पॅलिपहर्निया, यूएसए असा लिहिला आहे. पर्यटन धर्मादाय ट्रव्हलिस्टच्या दस्तऐवजात, प्रिन्स
हॅरी यांचे पूर्ण नाव आणि त्यांचा प्राथमिक पत्ता पॅलिपहर्निया असा लिहिला गेला आहे, त्यामुळे प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटन सोडल्याचे उघड झाले आहे. याआधी हॅरी नेहमी आपला प्राथमिक पत्ता म्हणून ब्रिटन लिहीत असत.

स्कॉटलँडमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

स्कॉटलँड येथील पर्यटनस्थळी दोन हिंदुस्थानी मुलांचा मृत्यू झाला. पाण्यात बुडून त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. लिम ऑफ टुम्मे हे स्कॉटलंड येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. दोन नद्यांचा संगम असलेले हे ठिकाण आहे. या पर्यटनस्थळाजवळील पाण्यात बुधवारी मुलांचे शव सापडले. 26 वर्षांचा जितेंद्रनाथ कस्तुरी आणि 22 वर्षांचा चाणक्य बोलीसेट्टी अशी त्यांची नावे आहेत.

‘पापा कहते है’ गाणे रिलाँच होणार

अभिनेता आमीर खानच्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील ‘पापा कहते है’ गाणे खूप लोकप्रिय आहे. आजही या गाण्याची व्रेझ कायम आहे. या गाण्याच्या चाहत्यांसाठी आमीर खान एक खास भेट घेऊन आलाय. ‘पापा कहते है’ गाणे आमीर पुन्हा लाँच करणार आहे. गाण्याला ‘पापा कहते है 2.0’ असे नाव आमीरने दिले आहे. राजकुमार राव आणि अलाया एफ यांच्या आगामी ‘श्रीकांत’ चित्रपटात हे गाणे असेल.