सावधान इंडियासाठी सुशांत सिंग नव्या लूकमध्ये

“सावधान इंडिया” चा नवीन सीझन यंदा “क्रिमिनल डिकोडेड” हा नवीन विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. या सिझनमध्येही प्रसिद्ध अभिनेता त्याचे सूत्रसंचालन करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुशांत सिंग या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून यंदाही तोच करणार असल्याचे समोर आले आहे. चॅनेलने सुशांत सिंगचा नवीन लूक आज प्रसिद्ध केला आहे.

सॉल्ट अँड पेपर दाढी आणि केस असा हटके लूक सुशांत सिंगला या सिझनसाठी देण्यात आला आहे. ”आमचा कार्यक्रम 2012 पासून टेलिव्हिजनवर सुरू आहे. हा एक लोकप्रिय शो आहे. शोचा होस्ट म्हणून मला विश्वास आहे की इतके वर्ष आमच्या पाठीशी उभे राहिलेले आमचे प्रेक्षक यंदाही आम्हााला साथ देतील.

सावधान इंडियाच्या नवीन सिझन स्टार भारतवर 26 सप्टेंबर पासून, सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता प्रदर्शित होणार आहे.