मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात 10 टक्के आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजूरी

मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याची शिफारस अहवालातून केली होती. आयोगाची ही शिफारस राज्य सरकारने मान्य केली आहे. आयोगाच्या या अहवालाल मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.

राज्य सरकारने मराठी आरक्षणासाठी आज एक विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्याआधी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.