केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ

सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आणि या प्रकरणाची सुनावणी 29 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर राऊज एव्हेन्यू न्यायालयाने त्यांच्या कोठडीची मुदत वाढवली. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. 1 एप्रिल रोजी न्यायालयाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सोमवारी त्यांना विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात ऑनलाईन माध्यमातून हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 23 एप्रिलपर्यंत वाढवली. न्यायालयाचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा काही मिनिटांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात संक्षिप्त सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आणि या प्रकरणाची सुनावणी 29 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. खंडपीठाने याप्रकरणी 29 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात होईल सुनावणी होईल, असे सांगितले. हे प्रकरण 2021-22 साठी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणाची तयारी आणि अंमलबजावणीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. संबंधित पॉलिसी नंतर रद्द करण्यात आली. उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना मनी लाँड्रिंग विरोधी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर 21 मार्च रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.