राज्यात गुन्हेगारी वाढली हे गृहमंत्र्यांचं अपयश – सुप्रिया सुळे

supriya-sule

भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. मी वारंवार निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती, असे देखील त्या म्हणाल्या. मात्र, कांदा निर्णयातीवरील बंदी ही पूर्णपणे उठवावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात आपण वारंवार केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आहे, या संदर्भातील पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्याबद्दल दररोज चर्चा असतात. जेव्हा भाजपाकडे 200 आमदार आणि 300 खासदार ऐवढी मोठी ताकद असतील तरी, त्यांना आमचे लोक हवे आहेत. यांचा अर्थ आमच्यात काही तरी गंमत आहे ना, काही तरी टॅलेंट आहे. त्याशिवाय ऐवढी ताकद असताना. आम्ही जे छोटे पक्ष राहिलेले आहे. ते पण हवे आहे तर, काही तरी दम आहे ना असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपामध्ये किती अहंकार आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत का? मला आश्चर्य वाटते की, मी भाजपाला फार जवळून पाहिले आहे. अटल बिहार वाजपेयीपासून ते सुषमा स्वराजपर्यंत एवढे मोठे नेते आम्ही पाहिले आहेत. पण त्या नेत्यांनमध्ये अहंकार नव्हता. भाजपा अहंकाराची भाषा करते, यांचे मला आश्चर्य वाटत आहे. ऐवढा संस्कृत पक्ष आता काय झाले त्या पक्षाला? असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही विचार करा, भाजपाने पक्ष फोडले आणि घरे फोडली. आता राज ठाकरेंना भेटायला चालले आहेत म्हणजे भाजपाने कितीही पक्ष फोडण्याचे राजकारण केले आणि विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्यानंतरही भाजपाला निवडणुकीत विजय होण्याचा आत्मविश्वास वाटत नाही. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपचे भ्रष्टाचार जुम्ला पार्टी हे मॉडेल तयार झाले आहे. ज्याच्यावर आरोप करतात दुसऱ्या दिवशी तोच नेता भाजपमध्ये जातो. पण या सगळ्यामध्ये भाजपकडे एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्या सारख्या छोट्या पक्षांमधील लोकांची गरज लागते म्हणजेच आमच्यात काही तरी टॅलेंट नक्कीच आहे. भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा आहे. भाजपनं पक्ष फोडले, घरं फोडले एवढेच नव्हे तर, इन्कम टॅक्स, ईडीचा ससेमीरा अनेकांच्या मागे लावला. एवढं झाल्यानंतरही भाजपचं राजकारण संपलेले नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यात पुणे, नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते. परंतु, राज्याचे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालयाचे ऑडिट करणे गरजेचे असल्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे.