शेतीसह परसबागही फुलली, वरून कमाई देखील झाली; गांडूळ खतामुळे महिलेचे कुटुंबात आनंद पसरला

कोल्हापूरच्या गोंडोली गावातील सुवर्णा पाटील यांचे नाव गाजायला लागले आहे. पाटील कुटुंबाकडे  2.5 एकर शेती असून त्यात उसाची लागवड करण्यात आली आहे. सुवर्णा यांना एका शेतकरी कृती शाळेत गांडूळ खत निर्मितीची माहिती मिळाली. त्या दिवसापासून सुवर्णा यांचे आयुष्यच बदलून गेले.  गांडूळखत हे जैव खत पर्यावरणास अनुकूल व किफायतशीर पर्याय आहे. त्‍यांनी 2022 मध्ये गांडूळखताचा शेतीसाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आणि येथून त्‍यांच्‍या प्रगतीशील शेतकरी-उद्योजक बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.

गांडूळखत हा कचरा म्हणजेच अन्नाचे तुकडे, वनस्पती साहित्य आणि पशुधनाचा कचरा (गुरांचे शेण) – मातीसाठी आवश्‍यक पोषक घटकांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रसिद्ध मार्ग आहे. गांडूळे जमिनीत राहून आणि गांडूळखताद्वारे सेंद्रिय पदार्थांचे कृमीत रूपांतर करून या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते, तसेच जमिनीचे आरोग्य सुधारते. त्यात उपलब्ध नायट्रोजनच्या पाचपट जास्त, पोटॅशच्या सात पट जास्त आणि नियमित वरच्या मातीत आढळणाऱ्या प्रमाणाच्‍या दीडपट जास्त कॅल्शियम असते. ठराविक कालावधीत गांडूळ खताचा नियमित वापर केल्यास जमिनीतील सुपीकता वाढू शकते आणि रासायनिक खतांची गरजही कमी होते

कोका कोला फाऊंडेशनच्‍या पाठिंब्‍याने सॉलिडरिदाद आणि दालमिया भारत शुगर इंडस्‍ट्रीज लि. (डीबीएसआयएल) यांनी संयुक्‍तपणे राबवलेल्‍या उन्‍नती मीठा सोना अंतर्गत सुवर्णा यांना वर्मीकंपोस्‍ट बेड मिळाला. याच्या माध्यमातून सुवर्णा या आजघडीला 3200 किलोपेक्षा जास्‍त गांडूळखत तयार करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरल्‍या आहेत. त्‍यांनी अतिरिक्‍त गांडूळखत त्‍यांच्‍या गावातील इतर शेतकऱ्यांना विकले आणि 20000 रुपये कमावले. हे उत्‍पन्‍न त्‍यांच्‍या ऊस पिकातून आणि स्‍थानिक दूध संकलन केंद्रावर विकणाऱ्या म्‍हशीच्‍या दूधातून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त आहे. सुवर्णा यांनी त्‍यांच्‍या घराच्‍या मागच्‍या बाजूस असलेल्‍या अंगणामध्‍ये परसबाग विकसित केली. त्‍या बागेमध्‍ये भाजीपाला ,वांगी व भेंडीचे उत्पादन घेतात.