संसद हल्ला; जाळलेले मोबाईल राजस्थानात जप्त

संसदेत घुसून स्मोकबॉम्ब हल्ला करणाऱया आरोपींचे फोन दिल्ली पोलिसांनी रविवारी जप्त केले. मोबाईल पह्न पूर्णपणे जळालेले आहेत. दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाने राजस्थानातून पह्नचे तुकडे जप्त केले, मात्र राजस्थानातील संबंधित ठिकाणाचे नाव पोलिसांनी उघड केलेले नाही. 13 डिसेंबरच्या घटनेनंतर मुख्य आरोपी ललित झा सर्वांचे पह्न घेऊन पळाला होता. 14 डिसेंबर रोजी ललित पोलिसांना शरण आला. त्यानेच सर्व पह्न जाळल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात शनिवारी महेश कुमावत या सहाव्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले.