विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता वाढवण्यासाठी इमॅजिन हब

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने नावीन्यपूर्ण असा ‘इमॅजिन हब’ उपक्रम सुरू केला आहे.  मुलुंड कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आलेल्या इमॅजिन हबमध्ये खगोलशास्त्र, रोबोटिक्स, एमएसी कोडिंग, टिंकरिंग, नृत्य, नाटक, संगीत, विणकाम आणि छपाई, कुंभारकाम आणि चित्रकला यांचा समावेश आहे.

‘इमॅजिन हब’मध्ये विद्यार्थ्याना प्रत्यक्ष कृती-प्रयोग करून डेटा विश्लेषण करता येते. समस्या सोडवण्याच्या क्षमतेस प्रोत्साहन देत, सहयोग, संवाद आणि कल्पकता यासारखी कौशल्ये वाढवणे हे ‘इमॅजिन हब’चे वैशिष्टय़ आहे.

अत्याधुनिक कला प्रयोगशाळांचे उद्घाटन चित्रपट निर्माते राहुल श्रीवास्तव, अॅपल इंडियाचे एज्युकेशन हेड हितेश शहा, अॅपॅडमिक्स- ऑर्किड्सच्या व्हीपी कविता चॅटर्जी आणि ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, मुलुंड कॅम्पसच्या प्राचार्या सुनयना अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आले.