
महापालिका जल अभियंता खात्याकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वांद्रे, सांताक्रुझ, खार, वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
एच पूर्व विभागात विमानतळ परिसर, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया वसाहत, सांताक्रुझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस, वांद्रे-कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व) येथे पाणीपुरवठा होणार नाही. 12 ऑगस्ट 2026 रोजी संपूर्ण एच/पूर्व विभागातील, सांताक्रुझ (पूर्व), खार (पूर्व), वांद्रे (पूर्व) भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे के/दक्षिण विभाग – 11 ऑगस्ट रोजी, कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, मासळी बाजार (फिश मार्केट), घाटीवाडा, चकाला, पी अॅण्ड टी वसाहत येथे दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा येथे सायं. 5 ते रात्री 10 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.




























































