तेलंगणाचे दोघे अमेरिकेत ठार

अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या दोन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एरिझोनात भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार झाले. निवेश मुक्का आणि गौतम कुमार पारसी असे या मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. निवेश मुक्का हा तेलंगणाच्या करीमनगरच्या हुजुराबादचा रहिवासी होता. तर गौतम कुमार हा जनगांव जिह्यातील घनपूर येथील रहिवासी होता. हे दोघेही एरिजोना स्टेट विद्यापीठात कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.