निराधारांना मदतीचा हात

‘जिथे मिळेल मदतीचा हात’ हे ब्रीदवाक्य जपत समाजकार्याची दशकपूर्ती केलेली संस्था म्हणजे ‘उडान फाऊंडेशन’. मनोरुग्ण, निराधार, बेघर तसेच बेरोजगारांचे आयुष्य सावरणारी ही संस्था असून आजपर्यंत संस्थेने 67 लोकांचे पुनर्वसन केले आहे. जवळपास 14 जिह्यांत संस्था लाखमोलाचे कार्य करत आहे.

सामाजिक बांधिलकीतून काही युवक-युवतींनी भूषण लाड यांच्या अध्यक्षतेखाली 2011 मध्ये ‘उडान फाऊंडेशन’च्या समाजकार्याचा श्रीगणेशा केला. संस्थेने सुरू केलेले सामाजिक उपक्रम पाहून डॉक्टर, वकील, शिक्षक अशा विविध क्षेत्रांतील मंडळी तसेच विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी असे अनेक संस्थेच्या कार्यात सहभागी होत गेले.  संस्था आज मुंबई, ङ्खाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  नगर, बीड, धाराशिव, नाशिक, रायगड अशा 14 जिह्यांत काम करत आहे.

‘‘आपल्या समाजात बेघर, बेवारस लोकांची वाढत चाललेली संख्या पूर्णपणे कमी करून लोकांमध्ये जनजागृती करण्यासाङ्गी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच व्यसनमुक्त समाज घडवण्याचा आमचा मानस आहे. तसेच कधीही कोणी अडीअडचणीत असो किंवा कुङ्गल्याही आपत्तीत अडकलेले असो, ‘उडान फाऊंडेशन’ तिथे पोहोचते. या संस्थेतील सर्व सदस्य स्वयंस्फूर्तीने वर्गणीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवितात हे विशेष असून ही मोङ्गी समाधानाची बाब आहे,’’ असे संस्थापक-अध्यक्ष भूषण लाड यांनी सांगितले.

 रस्त्याकडेला पडलेल्या बेघर, निराधार लोकांना आसरा देण्यापासून या संस्थेच्या कामाची सुरुवात झाली. निराश्रित विकलांग यांना सुरक्षित ङ्गिकाणी नेऊन औषधोपचार, पोलीस आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करणे, नातेवाईक नसल्यास त्यांना निवारा केंद्रात दाखल करणे ही कामे करत आहेत.

 हॉटेल, खानावळ तसेच अनेक समारंभांत शिल्लक राहिलेले ताजे अन्न फेकून न देता ते आपल्याकडे घेऊन रस्त्यावरील, झोपडपट्टीमधील भुकेल्या लोकांपर्यंत पोहोचवून अन्नदानाचा हा आगळावेगळा उपक्रम संस्था राबवत आहे.

व्यसनाधीन लोकांचे समुपदेशन करणे तसेच त्यांच्यावर औषधोपचार करून व्यसनमुक्त करणे.

 संस्था ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना लघू उद्योगांचे प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणांतर्गत गेल्या चार वर्षांपासून विविध ङ्गिकाणच्या महिलांना कापडी पिशव्या शिवण्याचे काम दिले जाते.

 महिलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळवून देण्यासाङ्गी ‘उडान फाऊंडेशन’च्या अंतर्गत ‘उर्वी वुमन्स क्लब’ची सुरुवातही करण्यात आली आहे.

 संस्था वाडय़ा-वस्तीतील, आदिवासी भागातील, डोंगरी भागातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध देते. होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाङ्गी दत्तक घेतले जाते.

 कोरोनाकाळात मुंबईसह उपनगरात संस्थेचे सदस्य लोकांना अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, मुक्या जनावरांना खाण्याची व्यवस्था करण्यात अग्रेसर होते. ‘उडान फाऊंडेशन’च्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आतापर्यंत संस्थेला 23 राज्यस्तरीय आणि तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.