मोदी गॅरंटी कुणाला? मिंधेंना की मिंधेंमुळे गोळ्या झाडणाऱ्या भाजप आमदाराला? उद्धव ठाकरे यांचा रोखठोक सवाल

पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधेंच्या गुंडांपासून स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी गोळीबार केला अशी जाहीर कबुली दिली. मिंधे मुख्यमंत्रीपदी असतील तर राज्यामध्ये गुंडांची पैदास होईल, मिंधेंकडे आपले कोटय़वधी रुपये आहेत, त्यांच्यामुळेच आपल्याला गुंडगिरी करावी लागली, असेही त्यांचे म्हणणे आहे. कदाचित त्यामुळेच मिंधे आणि मिंधेंच्या पोरांनी त्यांना उचकवणारा काटा बाजूला केला असेल. गायकवाड जेलमध्ये गेला की त्या मतदारसंघात आपल्याला विरोध करणारा कोणीच राहणार नाही यासाठीच हे कारस्थान केले गेले, असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. आता मोदी गॅरेंटी मिंधेला पावते की मिंधेंमुळे गोळय़ा झाडणाऱ्या भाजपच्या आमदाराला हे बघूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेचे तुफान आज सिंधुदुर्गात होते. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, मालवण येथे त्यांच्या विक्रमी सभा झाल्या. कोकणातील जनतेशी संवाद साधतानाच गद्दारांच्या नाकावर टिच्चून पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवणार म्हणजे दाखवणारच, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांचे सिंधुदुर्ग दौऱयात शिवसैनिक आणि कोकणवासीयांकडून जोरदार स्वागत झाले. सावंतवाडी येथील गांधी चौकात झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्थानिक आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या गद्दारीवर जोरदार लत्ताप्रहार केला. केसरकर यांचा डबल गद्दार असा उल्लेख त्यांनी केला. सत्तेची कितीही उब मिळाली तरी केसरकर यांच्या कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का ते आयुष्यभर पुसू शकणार नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते म्हणाले की, दर आठवडय़ाला, पंधरवडय़ाला शिर्डीला जाणारे केसरकर श्रद्धाळू असतील आणि त्यांच्याकडे सबुरीही असेल असे वाटले होते म्हणून त्यांना शिवसेनेत घेतले होते, पण त्यांची कोणत्याही पक्षावर श्रद्धा नाही आणि पक्षात थांबण्याची सबुरीही नाही. मोठय़ा अपेक्षेने केसरकरांना तिकीट दिले, मंत्री केले. पण गद्दारी त्यांच्या नसानसात भिनली आहे, शेवटी गद्दार तो गद्दारच, तो कधीही इमानदार होणार नाही असे सांगतानाच, येणाऱया निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातील ही घाण साफ करून टाका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित जनतेला केले.

माझ्याकडे भाडय़ाची माणसे नसतात. रक्तामासाने जोडलेली हक्काची माणसे असतात. तुमच्यासारख्या माझ्या हक्काच्या, रक्ताच्या नात्याच्या जनतेवर भरवसा ठेवून मी लढायला उभा राहिलो आहे. सोबत राहणार आहात काय? असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी विचारताच, सावंतवाडीच्या गांधी चौकात गगनभेदी होकार घुमला. सावंतवाडी विधानसभा असो वा सिंधुदुर्ग-रत्नागिरी असो, जे शिवसेनेच्या अंगावर आले त्यांचे नाव पुढची पिढी विसरून गेली पाहिजे, त्यांचे डिपॉझिट जप्त करायचे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना कुणाची हे विचारायला मी इथे आलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

ही तर कुटुंब संवाद यात्रा
ही जनसंवाद यात्रा नव्हे तर कुटुंब संवाद यात्रा आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. उपस्थित जनसमुदायावर नजर फिरवत ते म्हणाले की, तुम्ही सर्व माझे कुटुंब आहात. महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले. पुढेही लाभतील. परंतु एक कुटुंबातील मुख्यमंत्री म्हणून तुम्ही मला स्वीकारले. मन की बात-धन की बात हे तिकडे. इथे मात्र दिल की बात. कारण मनामध्ये काळेबेरे असू शकते, मात्र हृदयामध्ये नाही. हृदयात राम आणि हाताला काम. कल्याणपासून सुरुवात करून नंतर रायगड आणि आज सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिह्यापासून ‘माझी कुटुंब संवाद यात्रा’ ही चांदा ते बांदा नव्हे तर बांदा ते चांदा अशी असणार आहे, असे भावोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचा व्हिडीओ कुणीही न मागता तत्काळ बाहेर आला. कोणीही न मागता गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार सीसीटीव्ही फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचते तर लबाडांनी जो निर्णय दिला शिवसेना मिंध्यांची असल्याचे सांगितले, शिवसेनेची घटनाच नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही, ती जी आम्ही फिल्म दाखवली त्याचे चित्रीकरण आमच्याकडे न मागता निवडणूक आयोगाकडे मागितले आणि आयोगाने आमच्याकडे नसल्याचे सांगितले. त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची आहे याचे ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुमच्यासमोर ठेवले आहे हे चित्रीकरण दाखवलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या आवारात मिंधेंच्या गुंडांपासून माझ्या मुलाला वाचवण्यासाठी गोळीबार केला असे गणपत गायकवाड यांनी म्हटले आहे. मिंधे मुख्यमंत्रीपदी असेल तर राज्यामध्ये गुंडांची पैदास होईल. मिंधेंकडे आपले कोटय़वधी रुपये आहेत, त्यांच्यामुळेच आपल्याला गुंडगिरी करावी लागली असेही त्यांनी म्हटले आहे. कदाचित त्यामुळेच मिंधे आणि मिंधेंच्या पोरांनी त्यांना उचकवणारा काटा बाजूला केला असेल. गायकवाड जेलमध्ये गेला की त्या मतदारसंघात आपल्याला विरोध करणारा कोणीच राहणार नाही यासाठीच हे कारस्थान केले गेले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आता मोदी गॅरंटी मिंधेला पावते की भाजपच्या आमदाराला पावते हे बघूया, असेही ते म्हणाले.

सीसीटीव्ही कुणी आणि का समोर आणला?
गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ कुणी समोर आणला? कुणीही न मागता आणि गणपत गायकवाड यांनी गोळीबाराची कबुली दिली असतानाही व्हिडीओ बाहेर का आणला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. हा व्हिडीओ कोर्टात सादर करायला हवा होता, असेही ते म्हणाले.

विधायक काम करताना आपण कधी पक्ष किंवा माणूस पाहिला नाही. माझ्या कोकणात एखादी चांगली गोष्ट होत असेल तर चांगल्या गोष्टीच्या आड मी कधीही आलो नाही आणि येणार नाही ही आमची वृत्ती आहे आणि यालाच शिवशाही म्हणतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. याउलट कोकणात मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे झारीतील शुक्राचार्यही होते, असे सांगत त्यांनी नाव घेण्याचे टाळले. त्यावेळी थेट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांच्याशी संपर्क साधून आपण शासकीय मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा केला होता, अशी आठवणही उद्धव ठाकरे यांनी सांगितली. गटार सुटल्यासारखे बडबडत राहणाऱयांचा कोकणाला काडीचाही उपयोग होणार नाही, अशी टीकाही त्यानी राणे पिता-पुत्रांवर केली.

मी तुमच्यासोबत उभा असलो तरी अजूनही निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले नाही. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटेल तेव्हा मी येणारच आहे, पण विजयाच्या सभेलाही येईल, कारण कोकण माझे आहे आणि सगळे कोकणवासीय माझे आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकेकाळी कोकणात गुंडागर्दीचे थैमान होते. रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांचा अजूनही पत्ता लागलेला नाही. तेव्हाच ही कीड चिरडली असती तर यांची गद्दारीची घराणेशाही आजपर्यंत चालू राहिली नसती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपण मुख्यमंत्री असताना कोकणासाठी आलेला पाणबुडी पर्यटन प्रकल्पाला आपण मान्यता दिली होती, परंतु दुर्दैवाने सरकार पाडले गेले. नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात आले तेव्हा ते कोकणाला भरभरून देतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी कोकणातला पाणबुडी प्रकल्पच गुजरातला पळवला, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले. कोकणावर आलेल्या नैसर्गिक आपत्तींवेळीही त्यांनी महाराष्ट्राला एका पैशाची मदत केली नव्हती, याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

या जनसंवाद दौऱयामध्ये सौ .रश्मी ठाकरे, शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपनेत्या तथा महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपनेते गौरीशंकर खोत, सहसंपर्क प्रमुख बाळा म्हाडगुत, विशाखा राऊत, युवासेना कोकण विभागीय सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, नागेंद्र परब, माजी उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, सचिन कदम, कृष्णा धुरी, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, महिला आघाडी तालुका संघटक स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, नगरसेवक उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, नगरसेविका श्रेया गवंडे, सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, सचिन काळप, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, आदी उपस्थित होते.

सरकारमध्ये तीन गँग… भाजप, मिंधे आणि अजितदादा गँग
मुंबईतील गँगवॉर युती सरकारने मोडून काढले होते. आता दुर्दैवाने मिंधे सरकारमध्ये गँगवॉर सुरू झाले आहे. एक मिंधेंची गँग, एक भाजपची गँग आणि तिसरी गँग 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळय़ामुळे पाण्याखाली बुडाली आहे, तिला डोके वर काढता येत नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

सत्ताधारी हुकूमशहा त्रास देताहेत. जुन्या जुन्या केसेस बाहेर काढत आहेत. आणखी काढा. थोडे दिवस आहेत. नंतर आमचे दिवस येतील तेव्हा बघाच. चक्रवाढ व्याजासह परत करू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात वारंवार यायला लागलेत. देण्यासाठी येत नाहीयेत, जिथे येतात तिथून काहीतरी घेऊन जातात. आता ते मुंबईतही येत आहेत. त्यामुळे मुंबईतूनही ते काहीतरी पळवून नेतील अशी भीती वाटतेय.

भाजप संपला… शिवसेना आणखी फोफावली
उद्धव ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री राहिलेत. त्यांना मला असे विचारायचे आहे की, तुम्ही आता चिराट झाला आहात तरी तुमचे फोडाफोडीचे धंदे सुरूच आहेत. मी आजारी असताना तुम्ही हुडी घालून वेशांतर करून ज्या काही फोडाफोडी केला त्याच आता तुमच्या पक्षावर उलटल्या आहेत. तुम्ही तुमचा पक्ष संपवला आहे, मात्र शिवसेना आहे तिथेच आहे. ती आणखीन वाढली आहे, फोफावली आहे. जिथे जातोय तिथे माझ्यासोबत लोक येत आहेत आणि विशेष म्हणजे हिंदू तर आहेत रायगडच्या दोन दिवसाच्या दौऱयात मोठय़ा प्रमाणात मुस्लिम लोकही पक्षात आले. त्यांनाही कळतं की, आमचं हिंदुत्व वेगळं आहे. हिंदुत्व म्हणजे धर्माधर्मामध्ये आगी लावणारं नव्हे. आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारे हिंदुत्व आहे आणि तुमचं हिंदुत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे म्हणूनच मी हा संवाद दौरा सुरू केला आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या जनसंवाद यात्रेमध्ये दिला.

मिंध्याला कुठूनही खेचून आणला असता, पण नासके आंबेच नको होते
कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदाला चिकटून राहायचे असते तर मी चिकटून राहू शकलो असतो. आमदार फुटत आहेत हे मला समजले होते. त्यांना पकडून हॉटेलात टाकू शकलो नसतो का? मिंध्यालाही कुठूनही धरून, खेचून आणला असता. पण सडके आंबे मला नको होते. आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असेल तर अख्खी पेटी नासते. म्हणून मी सर्वात आधी नासके आंबे उचलून फेकून दिले, असे उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील जाहीर सभेमध्ये स्पष्ट केले. नासके आंबे फेकल्यानंतर आता आपल्याबरोबर फक्त मर्द उरले आहेत. ते सोबत आहेत तोवर कुणाचीही पर्वा नाही, मी लढायला उभा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणताच टाळय़ांचा कडकडाट झाला.

सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवणार ‘
‘अब की बार चारसौ पार’ अशा घोषणा देणारे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना एवढा भरवसा आहे तर इतर पक्षांमध्ये पह्डापह्डी का करतात, स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाहीत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्राची विधानसभा आणि दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचा असून तो आपल्यासाठी यशाचा क्षण असेल, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सामान्य शिवसैनिकाला बसवायचे आहे आणि बसवणारच, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कणकवलीतील गुंडांचा सुफडा साफ करून टाका
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपा नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर अचूक निशाणा साधला. विनायक राऊत व इतरांना निवडून नसते दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती, असे ते म्हणाले. त्याचवेळी कोकणवासीयांनी गुंडांना चेचून, खेचून टाकले. आता जी काय एका मतदारसंघात वळवळ सुरू आहे तीसुद्धा या वेळेला सुपडा साफ करून टाका, गुंडांचा चोपडा साफ करून टाका. अगदी जसे मंदिरामध्ये साफसफाई करताना जे मोदींचे पह्टो आले चकचकीत लादीसारखे. तसा हा एक मतदारसंघ राहिलाय तो साफ करून टाका, असे उद्धव ठाकरे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे नाव न घेता म्हणाले. यावेळी त्या टिनपाटाला आणखी भोके पाडायची, पुन्हा उभाच राहिला नाही पाहिजे, असे शरसंधान उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंवर साधले. शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणे यांना लाथ मारून शिवसेनेतून हाकलून दिले होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोकणवासीयांनी गाडले, आता संपूर्ण महाराष्ट्र गद्दारांना गाडणार
शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना कोकणवासीयांनी पूर्वीच गाडून टाकले आहे, आता हाच संदेश उर्वरित महाराष्ट्रातील जनता घेईल आणि येत्या निवडणुकीत गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मेडिकल कॉलेजला परवानगी दिली तिथे कोंबडय़ा खेळवण्याचा कारखाना उघडला!
कोकणवासीयांना शिवसेनेने काय दिले अशी टीका करणाऱया विरोधकांवरही उद्धव ठाकरे यावेळी बरसले. कोकणातील मेडिकल कॉलेजला महाविकास आघाडी सरकारनेच परवानगी दिली होती. आणखी एका मेडिकल कॉलेजलाही परवानगी दिली जिथे आज कोंबडय़ा खेळवण्याचा कारखाना उघडला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राणे यांचे नाव न घेता लगावला.