महिला प्रसाधनगृहात मोबाईल लपवले, तिघींनी व्हिडीओ पुरुषांना पाठवले; उडुपीतील घटनेमुळे खळबळ

कर्नाटकातील उडुपी येथील एका खासगी महाविद्यालयात घडलेल्या व्हिडिओ स्कँडलमुळे एकच खळबळ उडाली आहे. उडुपीच्या अंबालपाडी बायपासमध्ये असलेल्या नेत्र ज्योती कॉलेजमध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींनी हिंदू समाजातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी टॉयलेटमध्ये कॅमेरा लपवला. यानंतर या विद्यार्थिनींनी या व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवरून आपल्याच समाजातील मुलांना पाठल्या. दरम्यान या मुलांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल केल्याचे देखील बोलले जात आहे. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या तीन विद्यार्थिनींना महाविद्यालय प्रशासनाने 20 जुलै रोजी निलंबित केले आहे.

काहीदिवसांपूर्वी महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल कॅमेरा सापडल्याने खळबळ उडाली होती. या धक्कादायक व्हिडिओ स्कँडलमुळे हिंदुस्थानातील नेटिझन्सचे लक्ष वेधले आहे. या घडलेल्या प्रकारची शिक्षण संस्थेने त्याच दिवशी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर हा तपास सुरू करण्यात आला. हिंदू मुलींचे खाजगी व्हिडिओ शूट करण्यासाठी छुप्या कॅमेऱ्यांचा वापर करून ते व्हिडीओ मुस्लिम मुलांमध्ये पसरवणे हा जिहादी कटाचा भाग असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.