तरुणीने जोडीदार निवडण्यासाठी फॉर्म भरण्याचे केले आवाहन, 24 तासात तीन हजार तरुणांचे अर्ज

लंडनमध्ये राहणाऱ्या एका सुंदर तरुणी जोडीदाराच्या शोधात असून जोडीदाराच्या निवडीसाठी तिने चक्क फॉर्म भरायला सांगितले.  विशेष म्हणजे अवघ्या 24 तासात 3 हजार हून अधिक तरुणांनी अर्जही केले आहेत.

वीरा डिज्कमांस असे या तरुणीचे नाव आहे. व्यावसायाने ती एक मॉडेल आणि टीकटॉकर आहे. ती लंडन येथील रहिवासी आहे. काहीवेळा असे होते की, तरुण-तरुणी आपला जोडीदार शोधण्यासाठी डेटींग अॅप्सची मदत घेतात. मात्र या तरुणीने वेगळाच मार्ग निवडला. तिने सरकारी नोकरीसारखे आपल्या नावाचा अर्ज बनवून इच्छुकांना तो भरण्याचे आवाहन केले होते.

मेट्रो नावाच्या संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, वीराने प्रियकर बनवण्यासाठी एक फॉर्म भरायला सांगितला आणि तरुणांनी रांगच लावली. वीराने सांगितले की, अवघ्या 24 तासात तिच्याजवळ तीन हजार तरुणांचे फॉर्म आले. एवढ्या तरुणांनी तिचा प्रियकर होण्यासाठी फॉर्म भरले होते. आता वीरा त्यातील एका तरुणाची निवड करेल आणि त्यालाच आपला प्रियकर बनवेल. जो तिच्या सर्व अटी मान्य करेल.

वीराच्या सांगते की, एकटी राहून ती आता कंटाळली आहे आणि आता तिला एका जोडीदाराची गरज आहे. ती सांगते की, जो तरुण माझा प्रियकर बनण्यास योग्य समजतात ते फॉर्म भरु शकतात. तिने जो फॉर्म काढला आहे, त्यात त्यांनी तिची वैयक्तिक माहिती मागवली आहे. यासोबतच काही प्रश्नही विचारण्यात आले आहे, वीरा सांगते जो तिचा प्रियकर होईल, तो स्वावलंबी असायला हवा आणि त्यासोबत त्याला कार्टुन पाहण्याचाही शौक असला पाहिजे.