पॅलेस्टाईन समर्थकांच्या निदर्शनांनी अमेरिका हैराण; विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर अटक सत्र

Mass arrests across US universities as pro-Palestine protests intensify

इस्रायल – पॅलेस्टाईन युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही. या युद्धाच्या आगीत इराणनं तेल ओतलं आहे. त्यामुळे आता परिस्थिती अधिक चिघळली आहे. एरव्ही इस्रायलच्या सोबत उभं राहणाऱ्या अमेरिकेनं देखील आता आपली भूमिका कडक केली असून इस्रायला इशारा दिला आहे. या युद्धाचे पडसाद अमेरिकेत उमटत असून ऐन निवडणुकांच्या तोंडावर अमेरिकेत विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केल्यानं बायडन सरकार चिंतेत आहे. तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील इस्रायलने शस्रसंधी करण्याबद्दल विधान केलं आहे. यावरून अमेरिेकेतील बदलणारं चित्रं पाहायला मिळत आहे.

अमेरिकेत आता आंदोलकांवर कडक कारवाई सुरू असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी इस्रायलच्या गाझाबरोबरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेतील अनेक विद्यापीठांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. आतापर्यंत कोलंबिया विद्यापीठात अशा प्रकारची आंदोलनं होत होती. मात्र आता आयव्ही लीग स्कूल हार्वर्ड आणि येलसह किमान पाच विद्यापीठांमध्ये हे लोण पसरलं आहे.

टेक्सास विद्यापीठाच्या ऑस्टिन कॅम्पसमध्ये 100 सैनिकांची तुकडी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुमारे 20 विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात अशीच दृश्यं पाहायला मिळाली. पोलिसांनी पॅलेस्टिनी विद्यार्थी संयोजकास अटक केली. इथल्या व्हिडीओंमध्ये पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाठीचार्ज करताना पाहायला मिळत आहे.

हार्वर्डमध्ये, पॅलेस्टिनी समर्थक आंदोलकांनी कॅम्पसवर हल्ला केला, काही दिवसांनी विद्यापीठानं यार्डमध्ये प्रवेश रोखला असून फक्त हार्वर्ड आयडी धारकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.