उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध उपक्रम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिवसेनायुवासेना मागाठाणे शाखा क्रमांक 12 14तर्फे योजना विद्यालयातील किशोरवयीन विद्यार्थिनींना स्त्राrरोगतज्ञ डॉ. चंदन मोरे यांचे वैद्यकीय मार्गदर्शन शिबीर व शाळेसाठी मुख्याध्यापिका सुनीता कामथे यांच्याकडे सॅनिटरी पॅड आदी वस्तू सुपूर्द करताना शिवसेना उपनेत्या संजना घाडी, विभागप्रमुख उदेश पाटेकर. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा संघटक शुभदा शिंदे यांनी केले. याप्रसंगी माजी सिनेट सदस्य शशिकांत झोरे, उपविभागप्रमुख चेतन कदम, अशोक म्हामूणकर, रोहिणी चौगुले, गीता सिंघन, शाखाप्रमुख अशोक परब, सचिन मोरे, योगेश देसाई, कांचन सारदल, शुभदा सावंत, रेखा बोऱहाडे, शैला गायकवाड उपस्थित होते. 

कमला मेहता अंधशाळेत गणवेश वाटप

शिवसेना अपंग सहाय्य सेना व सिद्धिविनायक अंधअपंग संस्थेच्या वतीने दादर पूर्व येथील कमला मेहता अंधशाळेतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गुणवंत दिव्यांग विद्यार्थ्यांना गणवेश आणि स्कूल बॅग देण्यात आल्या. शिवसेना माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले. विभागप्रमुख महेश सावंत, उपविभागप्रमुख यशवंत विचले, मुख्याध्यापिका वर्षा जाधव, यशवंत कोळेकर, शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे, सरचिटणीस सुभाष कदम, राष्ट्रीय अपंग महाविकास महासंघाचे अध्यक्ष मंगेश मालोंडकर, संजय सुर्वे, मोहन लटम, सुधीर वाडेकर, शशांक घाडीगावकर, विनोद गावकर यावेळी उपस्थित होते.

Displaying 9c5206d8-ec3a-4083-b04a-8495c0599c4e (1) Megha.JPG

ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8चे विभाग प्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील आणि विभाग संघटिका प्रज्ञा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना मुंबई समन्वयक इमरान शेख यांच्या सहकार्याने मानखुर्दशिवाजी नगर विधानसभेच्या वतीने प. मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय गोवंडी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. सामाजिक उपक्रमास उपविभागप्रमुख तात्या सारंग, हेमंत साळवी, अख्तर शेख, गणेश नायडू, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण उपस्थित होते. 

Displaying IMG-20230728-WA0008 samna_ Mum_G Advt.JPG

शिवसेना शाखा क्र. 193 च्या वतीने श्री हनुमान मंदिर, वरळी कोळीवाडा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, आमदार सुनिल शिंदे कामगार नेते राजन लाड, सूर्यकांत पाटील, राम साळगावकर, निरंजन नलावडे, संदीप वरखडे, उपविभाग संघटिका अनुपमा परब, हरीश वरळीकर माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर, संस्कृती सावंत, राजवी लाड उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन शाखाप्रमुख सुर्यकांत कोळी, समन्वयक रुणाल लाड युवासेनेचे संकेत वरळीकर, जयराज जोशी, ऐशवर्या भिल्लारे यांनी केले 

Displaying vibhag 98.JPG

शिवसेना शाखा क्रमांक 98, खार (पश्चिम) यांच्या वतीने विभागप्रमुख ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाप्रमुख प्रफुल्ल घरत यांच्या संकल्पनेतून बळ हवे पंखांना अंतर्गत विभागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विभाग संघटिका रजनी मिस्त्राr, उपविभाग संघटिका अन्वेषा परब, मनीषा फोंडे, माधुरी लाड, पल्लवी आरोलकर, शाखाप्रमुख सुनील मोरे,  उपशाखाप्रमुख राजू घोसाळकर,  अमित तळपदे, दिलीप जाधव, तुषार शेलार उपस्थित होते.

Displaying 5ec216b6-a441-44c9-93d7-7647a236a0ef (Megha).JPG

लीलावती रुग्णालय युनिट भारतीय कामगार सेनेच्यावतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील 75 कर्मचाऱयांच्या दहावी, बारावी उत्तीर्ण मुलांचा भारतीय कामगार सेना अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत, सरचिटणीसआमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट अध्यक्ष, सहचिटणीसशाखाप्रमुख संदीप मेटकर यांच्याहस्ते नीलेश मुळये यांची मुलगी अदिती मुळये हिचा बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. याप्रसंगी इतर विद्यार्थ्यांनादेखील गौरविण्यात आले.