ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

अॅप्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऑनलाईन सेक्स रॅकेटचा वर्सोवा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी तिघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. तनिषा कनोजिया, रुद्र राऊत, तमन्ना खान अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

वर्सोवा परिसरात एक जण ऑनलाईन अप्सच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक गणेश पवार याच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन शिर्के, उप निरीक्षक मनोज हावळे, नागेश मिसाळ, महिला उप निरीक्षक अर्चना कोळी, चव्हाण, किंजलकर आदी पथकाने तपास सुरु केला.

पोलिसांचे पथक तनिषाच्या घरी गेले. तेव्हा ते तिघे अश्लील कृत्य करत होते. पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. त्या तिघा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तनिषा ही त्या ऍप्सच्या माध्यमातून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवते. प्ले स्टोअरवर ते ऍप्स डाऊन लोड केल्यास 1 ते 62 हजार रुपयाचे कॉइन त्या अप्सच्या माध्यमातून खरेदी करायला लागतात. कॉइन खरेदी केल्यावर युझरला एक लिंक येते. लिंक आल्यावर ऑनलाईन सेक्सचे विडिओ पाहता येतात.

तनिषा ही ते अप्सच्या माध्यमातून हे रॅकेट चालवते. ती इंस्टाग्रामवर त्या अप्सची माहिती अपलोड करते. प्रत्येक दिवशी कोणते सेक्सचे विडिओ दिसणार याची लिंक मध्ये माहिती अपलोड करत असायची. रोज ते अर्धा तास ऑनलाईन सेक्स चे ते विडिओ नेटिझन्सला दाखवतात. काही वर्षांपूर्वी तमन्ना ची तनिषा सोबत ओळख झाली. त्या ओळखीनंतर झटपट पैसे कमवण्यासाठी रुद्रच्या मदतीने ते गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत होते.