Jawan Movie – ज्या मुलीवर मी प्रेम करायचो ती शाहरूख खानवर प्रेम करायची, प्रसिद्ध अभिनेत्याचे विधान

अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा नवा चित्रपट जवान (Jawan) हा 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी चेन्नईतील श्री साईराम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटलीदेखील सहभागी झाला होता. या कार्यक्रमात अ‍ॅटली याने शाहरूख खान याच्याशी निगडीत एक आठवण सांगितली. अ‍ॅटली याने म्हटलंय की 13 वर्षांपूर्वी माझा शाहरूख खानच्या बंगल्याबाहेर गेटसमोर एक फोटो काढला होता. 13 वर्षानंतर त्याच मन्नत बंगल्याचे दरवाजे माझ्यासाठी खुले झाले होते.

गदर 2 च्या वादळात आयुष्मान खुरानाचा चित्रपट तगला

अ‍ॅटली याने या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “मला एक गोष्ट सांगायची आहे. मी दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत काम करत होतो. एथिरन नावाचा तो सिनेमा होता आणि त्याचं शूटींग मुंबईत सुरू होतं. मला एका मित्राने सांगितलं की आपलं शूटींग शाहरूख खान याच्या मन्नत बंगल्याबाहेर होणार आहे. मला त्याने मन्नत बंगल्याच्या गेटसमोर उभं राहून फोटो काढायला लावला होता. 13 वर्षानंतर त्याच मन्नत बंगल्याचे दरवाजे माझ्यासाठी खुले झाले “

जिथे कंडक्टर म्हणून काम केलं होतं, त्याच बसडेपोला रजनीकांत यांनी दिली भेट

या कार्यक्रमात अ‍ॅटली याच्याव्यतिरिक्त शाहरूख खान आणि विजय सेतुपती हे दोन्ही अभिनेते देखील सामील झाले होते. जवान चित्रपटात विजय सेतुपती हा खलनायकाची भूमिका साकारतोय. त्यानेही शाहरूख खानशी निगडीत एक आठवण सांगितली. त्याने सांगितले की शाहरूख खानमुळे तो ज्या मुलीवर प्रेम करायचा ती त्याच्या आयुष्यात येऊ शकली नाही. विजय सेतुपतीने गंमतीत म्हटले की मी शाळेत असताना माझं एका मुलीवर प्रेम होतं. मात्र त्याला याबाबत माहिती नव्हतं. ती मुलगी शाहरूख खान याच्या प्रेमात होती. त्यामुळे मला शाहरूख खान याचा बदला घेण्याची इतक्या वर्षानंतर संधी मिळाली. यावर हसून उत्तर देताना शाहरूख खान याने म्हटले की तू बदला घेऊ शकतोस पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुली माझ्यापासून कधीही हिरावून घेऊ शकत नाहीस.

डायना झाली नयनतारा, धर्म बदलून हिंदू झालेल्या या अभिनेत्रीची जीवनकहाणी थक्क करणारी आहे

 

जवान चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, प्रियामणी आणि बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा देखील आहे. मराठी अभिनेत्री गिरीजा ओक हिची देखील या चित्रपटात भूमिका आहे. चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिपीका पदुकोणही दिसणार आहे.