वेळ पडल्यास मंत्रालयात उपोषणाला बसू; खासदार विनायक राऊत यांचा इशारा

संगमेश्वर तालुक्यातील कुंडी आणि निगुडवाडी येथील शेतकऱ्यांच्या जमीनी गिळंकृत केल्या आहेत. विदर्भातील एक मंत्री जिल्हाधिकाऱ्यांपासून तलाठ्यांपर्यंत फोन करत होते आणि दबाव टाकत होते. विदर्भात अदानीला दिलेल्या जमिनीच्या बदल्यात त्यांना कोकणातील जमीन द्यायची होती. हा अदानीचाच व्यवहार असल्यामुळे सर्व अधिकारी चिडीचूप आहेत. बोगस माणसे उभी करून या जमीनी गिळंकृत केल्या गेल्या. 800 एकर जमीनीचा हा घोटाळा आहे. कोणतीही मोजणी न करता, संमत्तीपत्र न घेता या जमिनी अदानीच्या कंपनीला हस्तांतरीत केल्या असा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी केला. तसेच या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाल्या नाही तर गावातील ग्रामस्थांना घेऊन महसूल मंत्रालयात उपोषण करू, असा इशाराही खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. कुंडी आणि निगुडवाडी येथील जमीन घोटाळ्याच्या विरोधात ग्रामस्थांसह खासदार विनायक राऊत यांनी उपोषण सुरू केले आहे.

रायपूर राजनांदगाव, वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड नागपूर आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपन्यांनी विदर्भातील 284.27 हेक्टर आर जमीन वनक्षेत्राकडे वर्ग करण्याच्या बदल्यात निगुडवाडी येथील 250.13 हेक्टर आर क्षेत्रापैकी 106.07 हेक्टर आर जमीन कुंडी येथील 17.38.87 हेक्टर आर जमीन 2018 साली बोगस पध्दतीने खरेदी केल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. कुंडी आणि निगुडवाडी येथील हा जमीन घोटाळा सह्याद्री बचाव न्याय हक्क समितीने बाहेर काढला. आज त्याच समितीने स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. या उपोषणामध्ये खासदार विनायक राऊत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी आमदार सुभाष बने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, दीपक राऊत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात तीन महिन्यांपुर्वीच चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी चौकशीचे आदेश दिले. मात्र या चौकशीच्या आदेशांनाच केराची टोपली दाखवून अधिकाऱ्यांनी धुडकावले आहे. कुंडी आणि निगुडवाडीतील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहीजे आणि त्यासाठीच हा लढा उभारला आहे. दोन माणसांसाठीच देश चालवला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन माणसांसाठी देश चालवत आहेत. एक म्हणजे अंबानी आणि दुसरे म्हणजे अदानी. अदानीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वरदहस्त आहे. त्यामुळेच ही जमीन अदानी कंपनीला द्यायला तत्कालीन मंत्र्यांनी धावपळ केली. भूमाफिया, शासकीय अधिकारी आणि महसूलमधील अधिकाऱ्यांना संगनमताने कुंडी आणि निगुडवाडी येथील ही जमीन जागामालकांच्या घशात घालण्यात आली. बोगस कागदपत्रे करुन या जमीनी गिळंकृत केल्या गेल्या, असा आरोपही त्यांनी केला.

आम्ही उपोषण करणार हे कळल्यानंतर काल रात्री नऊ वाजता आम्हाला चौकशीचा अहवाल पाठवला. या चौकशीच्या अहवालामध्येही अजब कारभार आहे. एका बाजूला जमीनीची मोजणी केली नाही म्हणून सांगितले आहे. तर दुसऱ्या बाजूला यात कोणी दोषी नाही म्हणून सांगितले आहे, असा गौप्यस्फोट खासदार राऊत यांनी केला.

काल कोल्हेकुई झाली
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 6 ऑगस्ट रोजी घेतलेल्या शिवसेना शहर मेळाव्याला उत्तर देण्यासाठी सोमवारी शिंदे गटाने मेळावा घेतला. त्या मेळाव्यावर बोलताना काल रत्नागिरीत कोल्हेकुई झाल्याची टिका खासदार विनायक राऊत यांनी केली. काल जे काही बोलले त्याला योग्यवेळी उत्तर देऊ असा इशारा राऊत यांनी दिला. शेतकऱ्यांना