Video – ‘लप्पू सा सचिन, झिंगूर सा लड़का..सीमा हैदरच्या प्रियकरावरील गाणे हिट झाले

पाकिस्तानची सीमा हैदर आणि सचिन मीणा हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. पब्जी खेळताना दोघांची मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. या प्रेमापोटी सीमा तिच्या नवऱ्याला सोडून पाकिस्तानातून हिंदुस्थानात आली आहे. आपल्या मुलांसह हिंदुस्थानात आलेल्या सीमा आणि सचिनची जोडी पाहून अनेकांना धक्का बसला. दिसायला सुंदर असलेली सीमा ही किरकोळ दिसणाऱ्या सचिनच्या प्रेमात कशी काय पडली असा प्रश्न विचारला जाऊ लागला. यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचा सचिनच्या शेजारच्यांना संशय आहे. तपास यंत्रणाही सीमाची कसून चौकशी करत आहेत. मात्र या सगळ्याची पर्वा न करता पाकिस्तानातून आलेली सीमा तिला मिळत असलेली प्रसिद्धी एन्जॉय करत असल्याचं दिसून आलं आहे. सीमाचे डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल व्हायला लागले असून तिला मिळत असलेल्या प्रसिद्धीमनुळे तिला चित्रपट मिळाला असून खासदारकीचे तिकीट देखील मिळण्याची शक्यता आहे. तिच्या तुलनेत सचिन हा झाकोळला गेला असून त्याच्यावर यशराज मुखाटेने तयार केलेल्या गाण्यामुळे हा सचिन मीणा काहीसा प्रसिद्धीझोतात येण्याची शक्यता आहे.

सचिनच्या प्रेमात वेडी झालेली सीमा आपल्या 4 मुलांसह अवैद्यरित्या भारतात आली अन् आता ती भारतीय नागरीकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सीमावर विविध लोकांनी आतापर्यंत टीका केली आहे. तिच्यासोबत तिचा प्रियकर सचिन याच्यावरही टीका करण्यात आली आहे. टीका करणाऱ्यांमध्ये सचिनच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेचाही समावेश आहे.  तिने एका मुलाखतीत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले होतं. यावर अनेक प्रकारचे मीम देखील बनवण्यात आले होते. त्या शेजारणीने “लप्पूसा सचिन है, झिंगूरसा लडका, क्या है सचिन में, याला प्रेम म्हणतात का?” असं विधान केलं होतं. तिच्या याच वाक्यांपासून रसोड़े में कौन था?’ फेम यशराज मुखाटेने गाणं बनवलं आहे, जे काही मिनिटांमध्ये हिट झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

यशराजनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 18 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 2 लाख 86 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. अभिनेता आयुष्मान खुराना सह अनेकांना हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी आपली पसंती कॉमेंट बॉक्समधील प्रतिक्रियाद्वारे दर्शवली आहे. हे मजेशीर गाणे ज्याने कोणी ऐकले, त्याला हसू आवरत नाही. अनेकांनी या गाण्यातील एडिटिंगचं कौतुक केलंय. हे गाणं तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आम्हाला [email protected] वर कळवू शकता.