कांजुरमार्गमधील सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप

 

युवासेना कार्यकारिणी सदस्य राजोल पाटील यांच्या वतीने कांजुरमार्गमधील सरस्वती शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप संस्थेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश कोचरेकर, विजय तोडणकर, योगेश पेडणेकर, विजय कुरकुटे, कल्पिता वारंग, मयूर घाडगे, अभिलाष पवार, रवी महाडिक, तानाजी मोरे, मामा मंचेकर, श्वेता पावसकर, अदिती चव्हाण, पूजा नकाशे, नीना मांडलेकर, नानासाहेब पुंदे, विलास इंगळे, भाऊसाहेब घाडगे, सुमेधा जंगम, राजेश्री आहेर, सुशील मंचेकर आदी उपस्थित होते.