जरांगे यांना देवही घाबरतो -छगन भुजबळ

आता तर देवही मनोज जरांगे यांना घाबरतो. जरांगे सरकारला वेठीस धरत नाहीत, तर सरकारच जरांगे यांना वेठीस धरत आहे. सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि काही मंत्र्यांना जरांगेंच्या आंदोलनस्थळी कायमस्वरुपी बंगले द्यावेत, असा उपरोधिक टोला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांना लगावला. तसेच माझा जरांगे यांना पूर्ण पाठिंबा आहे, असेही भूजबळ म्हणाले.

आपण जरांगे यांचे ऐकायला पाहिजे. मंत्र्यांचे दोन-चार बंगले तिथे बांधले पाहिजेत. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याहाचे व्याही असे सर्वांना आरक्षण दिले पाहिजे, असेही भुजबळ उपरोधिकपणे म्हणाले.