सुब्रत रॉय यांचे निधन

सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुब्रत रॉय दीर्घ काळापासून आजारी होते. गेले दोन दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

सुब्रत रॉय यांचे पार्थिव आज लखनौच्या सहारा सिटीत नेण्यात आले. उद्या सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर गोमती नगरच्या वैपुंठ धाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी स्वप्ना रॉय, दोन मुले सुशांतो रॉय आणि सिमांतो रॉय असा परिवार आहे. सुब्रत रॉय यांना व्यापार, राजकीय, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात आली.

सुब्रत रॉय हे हिंदुस्थानातील आघाडीच्या सहारा इंडिया परिवाराचे संस्थापक होते. त्यांना देशभरात ‘सहाराश्री’ म्हणूनही ओळखले जात होते. 1992 मध्ये सहारा समूहाने राष्ट्रीय सहारा नावाचे वृत्तपत्र काढले. याशिवाय पंपनीने ‘सहारा टीव्ही’ नावाचे स्वतःचे टीव्ही चॅनेलदेखील सुरू केले होते. पंपनी मीडिया, रिअल इस्टेट, फायनान्ससह अनेक क्षेत्रांत काम करीत आहे. सुब्रत रॉय यांचा जन्म 10 जून 1948 रोजी बिहारमधील अररिया जिह्यात झाला. कोलकातामध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी गोरखपूरच्या एका सरकारी कॉलेजमधून मेपॅनिकल इंजिनीअरचे शिक्षण पूर्ण केले. सुब्रत रॉय यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात गोरखपूरमधून केली.