पक्षात एकतर अभिषेक बॅनर्जी राहील किंवा मी! TMC खासदार कल्याण बॅनर्जींचा ममतादीदींना अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात अभिषेक बॅनर्जी यांच्याशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात लढणार नाही. तसेच ममता बॅनर्जी यांनी ठरवावे त्यांना पक्षात कोण हवंय, मी की अभिषेक? असा थेट सवाल करत अल्टिमेटम दिला आहे.

कल्याण बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी अभिषेक बॅनर्जी यांचे कोणतेही प्रकरण लढणार नाही, कारण त्यांचा अहंकारी स्वभाव मला मान्य नाही. मी या व्यवसायात 45 वर्षे काम केले आहे. आज जे अनेक लोक मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी माझ्या हाताखाली काम केले आहे. अशा परिस्थितीत ते माझा अपमान कसा करू शकतात?”

मी स्पष्टवक्ता आहे, पण गद्दार नाही; कठीण काळात ममता बॅनर्जींची साथ सोडणार नाही, शत्रूघ्न सिन्हा यांचे मोठे विधान

कल्याण बॅनर्जी म्हणाले की, “मी पक्षातील ज्येष्ठ नेता आहे. मी अपमान सहन करणार नाही. अभिषेक बॅनर्जी यांनी हे समजून घेतले पाहिजे की, अलीकडील पराभवासाठी तेच जबाबदार आहेत. पक्ष सध्या ज्या संकटाचा सामना करत आहे, त्यामागेही त्यांचाच वाटा आहे.”

कल्याण बॅनर्जी यांनी पक्षप्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही थेट संदेश दिला. “मी दीदींना विनंती करतो की, जर तुम्ही अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच अवलंबून राहणार असाल तर, त्यांच्यासोबतच राहा आणि मला बाजूला करा. मात्र, जर तुम्ही अभिषेक बॅनर्जींपासून वेगळी भूमिका घेतली तर, मी तुमच्यासोबत उभा आहे,” असे त्यांनी म्हटले. अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाचे मोठे नुकसान केले असून तृणमूल काँग्रेसला अडचणीत आणण्यास तेच कारणीभूत आहेत”, असेही कल्याण बॅनर्जी म्हणाले.