21 कोटींच्या गुन्ह्यात भाजप नेत्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशात ग्वाल्हेरचे चार्टर्ड अकाऊंटंट अशोक विजयवर्गीय यांची क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 2 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप नेते आणि शाजापूर जिल्हा पंचायत सदस्य जगदीश कुमार मालवीय यांना अटक केली आहे. फसवणुकीच्या रकमेपैकी 50 लाख आरोपीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

ग्वाल्हेर येथील रहिवाशी असलेले 70 वर्षीय सीए अशोक विजयवर्गीय हे या सायबर फसवणुकीचे बळी ठरले होते. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले होते. डिसेंबर 2025 ते जुलै 2026 दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या खात्यांत 21 कोटी 5 लाख 92 हजार रुपये ट्रान्सफर केले होते. फसवणुकीच्या रकमेचा एक भाग शाजापूरचे रहिवासी जगदीश कुमार मालवीय यांच्या बँक खात्यात पोहोचला आहे. याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.