
मराठा समाजाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फसवणूक करत आहेत. मंत्रालयातूनच मराठे संपवण्याचा कट रचला जात आहे. कुणबी नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्दसुद्धा त्यांनीच करायच्या. मी एकटा पडावा म्हणून सरकारने जाणूनबुजून कट रचला आहे. सरकारने निवडून मराठय़ांकडून यायचं आणि नंतर मराठय़ांचा घात करायचा. आम्ही 2029 ला सर्वात मोठा बदला घेऊ, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने जात प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.






























































