
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात झालेल्या देणगी चोरीचा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्येही विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरले आहे. तर दुसरीकडे ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाचा भव्यदिव्य ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सिनेमाला ऑस्कर मिळाला नाही तर मी ज्युअरींवर निराश होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. रामायण सिनेमाला ऑस्कर मिळावा यासाठी ज्युअरींच्या घरी ईडी, सीबीआय पाठवा किंवा ज्युअरींचा गट फोडण्यासाठी अमित शहांना पाठवा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा कोट शेअर करत त्यांच्यावर हल्ला चढवला. “आधी राम मंदिरातील दान पेटी चोरीवर बोला. अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपाने लिहिले आहे. विषय राहिला ऑस्करचा. ज्युअरी मंडळींच्या घरी लगेच ईडी आणि सीबाआय पाठवा. काम सोपे आहे. किंवा ज्युअरींचा गट फोडण्यासाठी अमित शहा यांना पाठवा. चिंता करायची नाही”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
श्री देवेंद्रजी,
आधी राम मंदिरातील दान पेटी चोरीवर बोला
अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपा ने लिहिले आहे!
विषय राहिला ऑस्कर चा,
ज्युअरी मंडळींच्या घरी लगेच Ed आणि सीबीआय पाठवा साहेब,
काम सोपे आहे
किंवा ज्युरी चा गट फोडण्यासाठी अमित शहा याना पाठवा
चिंता नाही करायची! pic.twitter.com/m1rZ4CH4qM— Sanjay Raut (@rautsanjay61) August 7, 2026


























































