असं झालं तर…रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीत आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमचे रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीत असेल तर चार्ट तयार होईपर्यंत वाट पाहावी लागते आणि तो तयार झाल्यावरही तिकीट कन्फर्म झाले नाही तर ऑनलाइन तिकीट आपोआप रद्द होते.

इतर प्रवाशांनी त्यांचे तिकीट रद्द केल्यास तुमचा वेटिंग नंबर कमी होतो. चार्ट तयार होण्याच्या वेळेस वेटिंग नंबर शून्य आल्यास तिकीट कन्फर्म होते.

तुम्ही Indian Railways PNR Enquiry वर जाऊन तुमचा पीएनआर (PNR) क्रमांक प्रविष्ट करून सध्याची स्थिती तपासू शकता.

जर तातडीने निश्चित जागेची आवश्यकता असेल तर पर्यायी योजना (पर्यायी गाडय़ा, तत्काळ किंवा स्टेशन काऊंटरवर चौकशी) तयार ठेवा.

चार्ट तयार झाल्यावरही तिकीट वेटिंग राहिले तर प्रवाशांना त्या आरक्षित डब्यातून प्रवास करता येत नाही. अशा वेळी ई-तिकीट आपोआप रद्द होते आणि पैसे खात्यात परत येतात