पेण स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, तीन तासांपासून प्रवाशांचा खोळंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईहून मडगावकडे निघालेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे पेण स्थानकातच सकाळी सात वाजल्यापासून ट्रेन थांबवण्यात आली आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने गेल्या तीन तासांहून अधिक काळ प्रवासी पेण स्थानकात रखडले आहेत.

इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर पर्यायी इंजिन पाठवण्यात आलं असून, ते जोडल्यानंतर रेल्वे पुढे मार्गस्थ होणार आहे. मात्र, तीन तासांहून अधिक काळ रेल्वे एकाच जागी उभी असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे.