
दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवारी जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. 650 कोटी रुपयांच्या कथित औषध घोटाळ्यावरून आम आदमी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सभागृहाचे कामकाज सुरू असताना आम आदमी पक्षाचे आमदार कुलदीप कुमार आणि भाजप आमदार रवी नेगी आपापल्या जागेवर उभे ठाकले. दोन्ही नेत्यांमध्ये सभागृहातच अत्यंत तीव्र शब्दांत बाचाबाची आणि खडाजंगी झाली. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर इतर सदस्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले. या गदारोळाचा सध्या व्हायरल होत आहे.
दिल्ली विधानसभेमध्ये आप आमदार कुलदीप कुमार आणि भाजप आमदार रविंद्र सिंह नेगी यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक उडाली होती. विधानसभा अध्यक्ष आणि इतर सदस्यांना दोघांना आवरावे लागले. pic.twitter.com/nngtFILScP
— Saamana Online (@SaamanaOnline) August 7, 2026
श्रद्धांजली अर्पण करून कामास सुरुवात
दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मेहेरौली अग्निकांडात प्राण गमावलेल्या नागरिकांना आणि माजी आमदार बलजोर सिंह यांना सभागृहाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील जनहितार्थ प्रश्न आणि स्थानिक समस्या सभागृहात मांडत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जो राजा जनतेला घाबरला, त्याची जाण्याची वेळ आलीय! अरविंद केजरीवाल यांचा इशारा





























































