जाहिरातदारांनी पाठ फिरवली; एलन मस्कची चिंता वाढली

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची खरेदी केल्यापासून ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क चर्चेत आहेत. तब्बल 44 अब्ज डॉलर्स मोजून ट्विटर खरेदी करण्यात आले. तेव्हापासून एलन मस्क हे एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत सुटले आहेत. परंतु, आता थेट जाहिरातदारांनी पाठ फिरवल्याने एलन मस्क यांची चिंता वाढली आहे. जाहिरातीमधून होणारी ट्विटरची कमाई घसरली आहे, अशी कबुली स्वतः एलन मस्क यांनी जाहीरपणे दिली आहे. एलन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर सर्वात आधी अनेक जुन्या कर्मचाऱयांना कामावरून तडकाफडकी काढून टाकले. त्यानंतर ट्विटरचे फ्री मिळणारे सब्सक्रिप्शन बंद करून महिन्याला सहाशेहून अधिक रक्कम मोजायला लावली. परंतु, तरीही ट्विटरमधून मिळणाऱया रकमेत वाढ झाली नाही. दरम्यान, ट्विटरला टक्कर देण्यासाठी मेटाने बाजारात आणलेल्या अॅप थ्रेडने डाउनलोडचे अनेक विक्रम मोडले आहेत त्यामुळे एलन मस्कची चिंता वाढली आहे.