
देशांतर्गत क्रिकेटकडे दुर्लक्ष केल्याच्या वाढत्या टीकेनंतर बीसीसीआयने दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा नवा प्लॅन तयार केला आहे. सुरुवातीचे सामने लाइव्ह न दाखवल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआयने अंतिम सामना टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दुलीप ट्रॉफी ही देशातील प्रतिष्ठेची प्रथम श्रेणी स्पर्धा मानली जाते. या निर्णयामुळे युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार असून देशांतर्गत क्रिकेटला अधिक प्रसिद्धी, प्रेक्षक आणि व्यावसायिक मूल्य मिळण्याची शक्यता वाढली आहे.


























































