सिनसिनाटीत सनसनाटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनसिनाटी ओपनला मोठा धक्का बसला असून जागतिक क्रमवारीतील अव्वल यानिक सिनरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर आता कार्लोस अल्काराझही दुखापतीमुळे बाहेर पडल्याने स्पर्धेचा रंगच बदलला आहे. विम्बल्डन विजेता सिनरने वैद्यकीय उपचारांनंतरही पूर्ण तंदुरुस्ती नसल्याचे स्पष्ट केले. अल्काराझच्या अनुपस्थितीमुळेही चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. अमेरिकन ओपन अगदी जवळ असताना या दोन्ही सुपरस्टार्सच्या फिटनेसवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुरुष टेनिसमधील विजेतेपदाच्या शर्यतीत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.