
इंग्लंडच्या दौऱयात टीम इंडियासाठी कर्दनकाळ ठरलेल्या हॅरी ब्रुक्सला आयसीसीने ’प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. जुलै महिन्यातील हॅरी ब्रूकच्या प्रभावी कामगिरीने इंग्लंडला हिंदुस्थानविरुद्धची मालिका जिंकता आली होती. ही मालिका जिंकण्यात ब्रुक्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रुक्सने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 229 धावा केल्या. या पुरस्कारासाठी आयसीसीने ब्रुक्ससह वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्हज आणि बांगलादेशचा सलामीवीर तंजीद हसन यांनाही पुरस्कारासाठी नामांकनं दिली आहेत. जस्टिन ग्रीव्हजने जुलै महिन्यात कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्पृष्ट कामगिरी केली. त्याने नॉर्थ साउंड येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 180 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर बांगलादेशचा सलामीवीर तंजीद हसन हा संघाचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून उदयास आला.


























































