
गणेशोत्सव 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत असून त्याच्या नियोजनासाठी सर्व गणेश मंडळे आणि संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक उद्या दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ताडदेवच्या नाना चौक येथील महानगरपालिका ‘डी’ विभागामध्ये होणाऱ्या या बैठकीला पालक मंत्र्यांसह पोलीस, महानगरपालिका, रेल्वे, मुंबई मेट्रो, अग्निशमन दल आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
या विषयांवर होणार चर्चा
- बेस्ट, मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ.
- विविध ठिकाणी सार्वजनिक फिरत्या शौचालयांची सुविधा.
- सार्वजनिक ठिकाणे, समुद्र
किनाऱयांवरील स्वच्छता प्रभावीपणे राखण्यासाठी मनुष्यबळ वाढविणे.
- पालिकेकडून गणेश मंडपांसाठी परवानग्या, वीज पुरवठा.
- समुद्रात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अधिक संख्येने जीवरक्षकांची तैनाती.




























































