आधी राज्यगीत नंतर ‘वंदे मातरम्’, विजय यांची ठाम भूमिका… तामीळ आमची जीवनवाहिनी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाण्याचे केंद्र सरकारचे निर्देश आहेत, मात्र तामीळनाडूमध्ये ‘वंदे मातरम्’ऐवजी तामीळ गीत ‘तामीळ थाई वाझथु’ हे राज्यगीत सर्वप्रथम गायले जाईल. तसा ठराव तामीळनाडूच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाला. ‘तामीळ ही केवळ भाषा नसून ती आमची जीवनवाहिनी आणि भावना आहे’, असे मुख्यमंत्री विजय यांनी हा ठराव मांडताना सांगितले.

मुख्यमंत्री विजय यांनी सांगितले की, राज्यात तामीळ गीतालाच सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे. राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तामीळनाडूमध्ये ‘तामीळ थाई वाझथु’लाच सर्वप्रथम स्थान मिळाले पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे, असे विजय यांनी स्पष्ट केले. विजय यांनी मांडलेला ठराव म्हणजे केंद्राच्या निर्देशांना दिलेले आव्हान म्हणून पाहण्यात येत आहे. या ठरावाच्या बाजूने डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांनीही पाठिंबा दिला.