जय गोहिलला संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुलीप ट्रॉफी सुरू होण्याआधीच वेस्ट झोनला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे सरफराज खान स्पर्धेबाहेर गेला असून त्याच्या जागी सौराष्ट्रचा 25 वर्षीय जय गोहिल संघात दाखल झाला आहे. रणजी ट्रॉफीत गोहिलने जबरदस्त फलंदाजी करत 523 धावा, एक शतक आणि चार अर्धशतके झळकवली होती. राखीव खेळाडूपासून थेट मुख्य संघात आलेल्या गोहिलसमोर आता स्वतःची छाप पाडण्याची सुवर्णसंधी आहे. बंगळुरूमध्ये होणाऱया या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याच्या कामगिरीकडे राष्ट्रीय निवड समितीचेही लक्ष लागले आहे.