दहा वर्षात सात वेळा नवऱ्याला तुरूंगात टाकले, नंतर त्याला बाहेर काढायची

अहमदाबादमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका महिलेने नवऱ्याला 10 वर्षात सात वेळा पोलिसांना अटक करायला लावले. त्यानंतर सातही वेळा ही महिला नवऱ्याला गॅरेंटर राहून त्याला बाहेर काढले. या अनोख्या घटनेबाबत सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे.

प्रेमतंद असे त्या व्यक्तीचे नाव असून तो पटना येथील रहिवासी आहे. त्याने मेहसाना येथील सोनू माळी या तरुणीशी 2001 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर दोघंही काडी येथे स्थायिक झाले होते. दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरू होता. 2014 मध्ये दोघांमध्ये दुरावा आला आणि 2015 मध्ये सोनू घरगुती हिंसाचार अंतर्गत प्रेमचंद विरोधात खटला दाखल केला आणि न्यायालयाने महिन्याला 2000 रूपये सोनूला पोटगी देण्याचे आदेश दिले. रोजंदारीवर काम करणारा प्रेमचंद यांच्यात कायम भांडणे व्हायची आणि पुन्हा ते एकत्र यायचे. प्रेमचंद यांनी 2015 मध्ये पोटगीची रक्कम पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला, परिणामी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि त्याने पाच महिने तुरुंगात काढले.

वाद होऊनही हे जोडपे एकत्र राहत होते.  सोनूने तिच्या पतीला 2016 ते 2018 या काळात दुखापत केल्याच्या आरोपाखाली दरवर्षी अटक केली. पण प्रत्येक वेळेला  तिनेच त्याच्या जामिनाची व्यवस्था केली. त्यानंतर 2019 आणि 2020 दरम्यान प्रेमचंद तिला पोटगीचे पैसे देऊ शकला नाही आणि पुन्हा त्यांच्यात भांडणे होऊ लागली. पुन्हा अटक करुन त्याला 2023 साली 4 जुलै रोजी सोडण्यात आले आणि तो काडी येथे घरी परतला. 5 जुलैला प्रेमचंदचा मोबाईल आणि पाकीट हरवले होते. त्याने सोनूवर संशय व्यक्त केला. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि तो इतका वाढला की, तो मारहाणीवर आला. यावेळी दोघांचा 20 वर्षीय मुलगा रवी यानेही आपल्या वडिलांना मारहाण केली. प्रेमचंद याने काड़ी पोलीसात त्याच्या डोळ्यात लाल मिरची पावडर घातली, मारहाण केल्याची बायको सोनू आणि मुलाविरूद्ध पोलीसात तक्रार दाखल केली.. कंटाळलेल्या प्रेमचंद अखेर घर सोडून त्याच्या आईकडे पाटणला आला.