माझ्या बायकोला निवडून दिलं तर तुम्हाला फायदाच! अजित पवारांकडून पुन्हा निधीचा मुद्दा

‘तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं, तर माझा तुम्हाला फायदाच होणार आहे. मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकार त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणू शकेल,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा जिह्यातील निधी वाटपाचा मुद्दा निवडणुकीत ऐरणीवर आणला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी खडकवासला मतदारसंघात भेटीगाठी आणि बैठका घेऊन प्रचार केला. रात्री एका बैठकीमध्ये त्यांनी निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित करून मी पुणे जिह्याचा पालकमंत्री आहे. माझ्या बायकोला निवडून दिले, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल असे सांगितले. अजित पवार म्हणाले, ‘यात माझी पण जबाबदारी वाढणार आहे. उद्याच्याला बायको घरी म्हणाली हे काम करून दे तर सकाळी मला करून द्यावेच लागणार आहे, नाहीतर माझं काही खरं नाही, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाण्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे. डिलाईल रोडवरील ना. म. जोशी मार्ग महापालिका शाळेतील निवडणूक पेंद्रावर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील विविध पेंद्रांवर पाठवण्यात येणाऱया ईव्हीएम मशीनच्या नोंदणीचे काम सध्या सुरू आहे.