‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्यावर घरोघरी चिमुरडय़ांचे रील्स

गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. बघता बघता सहा दिवस उलटले आहेत. सोशल मीडियावरही उल्हास आणि जल्लोष दिसत आहे. अशातच यंदा एका गाण्याने सोशल मीडिया गाजवले असेच म्हणावे लागेल. हे गाणे आहे, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ होय, यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणं वाजतंय आणि गाजतंय. अनेक जण या गाण्यावर रील्स आणि व्हिडीओ बनवून शेअर करत आहेत. घरोघरी लहान मुलांचे रील्स तयार होत आहेत. केवळ लहानच नव्हे, तर मोठय़ांनाही गाण्याने वेड लावले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे याचा ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ व्हिडीओ व्हायरल झाला. ‘टुकुटुकु बघतोय कसा’, यावर साईराजने केलेल्या निरागस हावभावामुळे नेटिजन्सनी हे गाणे डोक्यावर घेतले. त्यानंतर बालकलाकार मायरा वैकुळनेही साईराजसोबत या गाण्यावर रील्स केली. मूळ गाणे भिवंडी येथील शैर्य आणि माऊली घोरपडे या भावडांचे आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)