विमा घ्या, बचत करा!

>> चंद्रहास रहाटे, [email protected]

विमा पॉलिसी म्हणजे आधी निर्माण, मग बचत. हा नेमका काय प्रकार आहे? बचत करण्याअगोदर निर्माण कसे काय होऊ शकते? बचतीमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे आधी निर्माण मग बचत आणि दुसरा म्हणजे आधी बचत, मग निर्माण. या दोन्ही बचतींचे प्रकार आपण समजून घेणे गरजेचे आहे.

आपल्याला गुंतवणूक करायची झाल्यास 100 टक्के रक्कम आपण रिस्क गुंतवणुकीमध्ये म्हणजेच जोखीम असलेल्या गुंतवणुकीमध्ये करीत नाही. प्रत्येकाच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करून बाकी रक्कम आपण सुरक्षित प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये गुंतवतो. या सुरक्षित गुंतवणुकांमध्ये शॉर्ट टर्मसाठी बँक रिकरिंग डिपॉझिट, पोस्ट रिकरिंग डिपॉझिट, म्युच्युअल फंडमधले डेट प्रकारातले एसआयपी तसेच लॉन्ग टर्मसाठी पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना यांचा समावेश होतो, पण या सर्व योजना मात्र ‘आधी बचत, मग निर्माण’ या प्रकारात मोडतात. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष बचत केल्याशिवाय निर्मिती होऊच शकणार नाही. उदाहरणार्थ, पीपीएफमध्ये आपण 20 वर्षांसाठी दरवर्षी गुंतवणूक करणार असू आणि आपण पाच वर्षांसाठी पैसे भरू शकलो, तर पाच वर्षांत जेवढे जमा झाले तेवढेच पैसे व्याजाने आपल्याला मिळणार. आपण जर हयात असू तर हे पैसे भरले जातील व 20 वर्षांत ठरविल्याप्रमाणे निर्माणही करता येतील, पण आपल्या अनुपस्थितीत काय? जेव्हा आपली बचत थांबेल तोपर्यंत जेवढे पैसे जमा झाले तेवढेच पैसे आपल्या कुटुंबाला मिळतील, पण जे निर्माण करायचे स्वप्न पाहिले ते अर्धेच राहील.

अशा वेळी आपली गुंतवणूक जर ‘आधी निर्माण, मग बचत’ या प्रकारात झाली तर काय फरक पडेल हे जाणून घेऊ या. बचतीला सुरुवात केलेल्या पहिल्या दिवसापासून आपण जे निर्माण करायचे स्वप्न योजिले आहे ते सुरक्षित होते. या गुंतवणुकीच्या  प्रकारात पारंपरिक विमा योजनेचा समावेश होतो. उदाहरण म्हणून घ्यायचे झाल्यास 50 लाखांच्या पॉलिसीचा एक जरी प्रीमियम भरला असेल तरीही 50 लाखांची रक्कम कुटुंबासाठी तयार असते आणि तीही पुढील प्रीमियम न भरता. आहे की नाही हे ‘आधी निर्माण आणि बचत.’

हे अधिक समजून घेण्यासाठी पीपीएफ व पारंपरिक विमा यांतील फरक जाणून घेऊ या. समजा मुलाच्या शिक्षणासाठी एका 30 वर्षे वयोगटातल्या पालकाने 21 वर्षांसाठी दरवर्षी 1.50 लाख गुंतवण्याचे ठरवून पीपीएफ अकाऊंट चालू केले व दुसऱ्याने पारंपरिक विम्याची योजना चालू केली आणि आयुष्याच्या टप्प्यावर बचत सुरू केलेल्या पालकाची अनुपस्थिती झाली तर कुटुंबाला किती रक्कम मिळेल, ते जाणून घेऊया.

(पारंपरिक विमा योजनेच्या उदाहरणासाठी आयुर्विमा महामंडळाच्या एंडोमेंट पॉलिसीचा संदर्भ घेतला आहे.)

या वरील तक्त्यानुसार आपल्याला हे लक्षात येईल की, अगदी 18 वर्षांपर्यंत पारंपरिक विमा पॉलिसी पीपीएफच्या अंतर्गत दराला पाठी टाकते. अगदी 2118  टक्क्यांपासून 7.88 टक्के दराने आपली संपत्ती निर्माण झालेली असते. अगदी सुरुवातीला जेव्हा कुटुंबाला सुरक्षेची सर्वाधिक गरज असते तेव्हा अगदी एक प्रीमियम भरूनदेखील पूर्ण विमा रक्कम कुटुंबाला मिळते. याउलट पीपीएफमध्ये जेवढे हप्ते भरलेत त्यावर व्याज जोडून रक्कम कुटुंबाला मिळते.

प्रत्येक गुंतवणूक प्रकारामध्ये काहीतरी विशेष असते. त्यामुळे मी असे म्हणणार नाही की, पीपीएफमध्ये पैसे गुंतवू नका, पण सर्व प्रकारच्या गुंतवणुकींमध्ये योग्य प्रमाणात पैसे गुंतवा. म्हणजे जोखमीचे नियोजन होईल, फायदाही मिळेल. लेखामुळे पारंपरिक विमा योजनेची दुसरी बाजू आपल्याला माहिती होण्यास मदत होईल. पारंपरिक विम्याच्या सुरक्षित योजनांचाही समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच व्हायला हवा.