Patana fire – पाटणा येथे हॉटेलला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू; तर 20 हून अधिक जण जखमी

बिहारमधील पाटणा येथे गुरुवारी रेल्वे स्टेशनजवळील पाल हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत 6 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक जणं जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा स्टेशन जवळील पाल हॉटेलला सकाळी अचानक आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आहे. यावेळी हॉटेलमध्ये असलेल्या 6 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक लोकं जखमी झाली आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासोबत अनेक लोकं हॉटेलमध्ये अडकल्याची शक्यता आहे. घटनास्थळावर पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरु आहे.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”><a href=”https://twitter.com/hashtag/WATCH?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#WATCH</a> | Bihar: Massive fire breaks out in a hotel near Golambar in Kotwali police station area, in Patna. Fire tenders present at the spot. Firefighting and rescue operations underway. 12 people rescued so far and sent to PMCH. <a href=”https://t.co/yp9AI3w3aV”>pic.twitter.com/yp9AI3w3aV</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1783384344549294357?ref_src=twsrc%5Etfw”>April 25, 2024</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

हॉटेमध्ये लागलेल्या आगीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आगीचा भडका उडत असल्याचे दिसत आहे.  हॉटेलमध्ये लागलेल्या या आगीमुळे आसपास धुराचे लोट दिसत आहेत. बोललं जात आहे की, आगीची ही घटना रेल्वे स्टेशनपासून 50मीटर दूर अंतरावर घडली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अग्निशमन दलाचे अधिकारी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा पोहोचला होता. रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली. हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.