Chandrayaan 3: चंद्रावर जीवसृष्टी वसवता येऊ शकते?…चांद्रयान 3 कडून मिळाली महत्त्वाची माहिती

चांद्रयान – 3 दररोज नवनवीन माहिती इस्रोला पाठवत आहे. नुकतेच इस्रोला मिळालेल्या माहितीनुसार चंद्र राहण्यायोग्य असल्याचे म्हटले जात आहे. इस्रोच्या नव्या माहितीनुसार चंद्रावर कायमस्वरुपी मानवी वस्ती स्थापन केली जाऊ शकते.

विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरला. त्यानंतर रोव्हर लँडरतर्फे रोज नवी माहिती पाठवत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान 50 ते 70 अंश सेल्सिअस आहे, तर पृष्ठभागा खालील तापमान मायनस 8 सेमी असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. यामुळे चंद्रावर राहण्यायोग्य वातावरण तयार होऊ शकते. विक्रम लँडरने केलेल्या पृष्ठभागावरील तपासात असे दिसून आले आहे की, पृष्ठभागाखालील तापमान जास्त थंड आहे. परंतु चंद्राचा पृष्ठभाग हा सुपर इन्सुलेटर असल्याचे देखील पुरावे मिळाले आहेत. तेथील तापमान रात्री उणे 140तर दिवसा 113 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. पण जसजसे तापमान 30 सेंटीमीटर किंवा त्याहून कमी होईल तसतसे ते स्थिर होईल.

चंद्रावर वातावरण नाही. सूर्याप्रकाशासोबत थेट संपर्क येतो. त्यामुळे त्याचा काही भाग दिवसा 123 अंश सेल्सिअसपर्यंत गरम होतो, तर हिवाळ्यात ते उणे 233 अंशावर पोहोचते. त्यामुळे तेथे इन्सुलेशनची प्रक्रिया जलद होते. चंद्रावर जीवसृष्टी वसवायची असेल, तर या इन्सुलेटरच्या माध्यमातून तेथील तापमानाचा समतोल साधता येईल.