धोकादायक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसकू नका; खोल्या दुरुस्तीसाठी तातडीने अर्ज करण्याचे दिलीप स्वामी यांचे आदेश

पावसाळा सुरू झाला असला तरी शहर आणि जिह्यातील धोकादायक वर्गखोल्या व शाळांची दुरुस्ती झालेली नाही. दरकर्षी पावसाळ्यात वर्गात पाणी येत असल्याने मुलांना दुसरीकडे बसवावे लागते, अशी वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर धोकादायक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसकू नका, काही दुरुस्ती असल्यास मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकाऱयांकडे तातडीने अर्ज करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार 595 शाळा आहेत. त्या अंतर्गत दोन लाख दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गतवर्षी जिह्यातील 504 शाळांच्या 1200पेक्षा जास्त वर्गखोल्या धोकादायक होत्या. पण, जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी सीईओ स्वामी यांनी सर्व  शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यातील बऱयाच ठिकाणची दुरुस्ती करून घेतली आहे. तरीसुद्धा अनेक शाळांमधील वर्गखोल्या पावसाळ्यात गळतात, काही शाळा जुन्या आहेत. त्यामुळे पाऊस सुरू असताना संबंधित मुख्याध्यापकांनी त्या वर्गातील मुलांना दुसरीकडे बसवून त्यांचे अध्यापन करावे.

मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांमधील धोकादायक वर्गखोल्यांची माहिती तातडीने कळवावी, असेही त्यांना आदेश देण्यात आले आहेत. अजून आपल्याकडे अपेक्षित पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नेमक्या किती वर्गखोल्या किंवा शाळा नादुरुस्त आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. तरीपण गटशिक्षणाधिकाऱयांनी बांधकाम विभाग व गटविकास अधिकाऱयांच्या माध्यमातून ती कामे तातडीने करून घ्याकीत. निधी कमी पडल्यास मागणी करावी असेही स्वामी यांनी अधिकाऱयांना स्पष्टपणे सांगितले आहे.

सोलापूर जिह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व धोकादायक शाळा व वर्गखोल्यांसंदर्भात मागील महिन्यात बैठक पार पडली. त्यात त्याच्या दुरुस्तीच्या सूचना करून डागडुजी करण्यात आली आहे. अजूनही कोठे तशी गरज भासल्यास मुख्याध्यापकांनी थेट गटशिक्षणाधिकाऱयांकडे पत्रव्यवहार करावा. पण, धोकादायक वर्गखोल्यांत विद्यार्थ्यांना बसवू नये, असे आदेश सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आहे.

महापालिका शाळांच्या अनेक खोल्या गळक्या

सोलापूर महापालिकेच्या शहरात 58 शाळा असून, त्यात साडेपाच हजार विद्यार्थी शिकत आहेत. मागील वर्षी अनेक शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये पाणी टिपकत असल्याने मुलांना त्याठिकाणी शिकणे मुश्कील झाले होते. काही शाळांमध्ये शिक्षकांना बादल्या ठेवाव्या लागल्या होत्या. या पार्श्वभूमीकर प्रशासन अधिकारी विठ्ठल ढेपे यांनी शहरातील आठ विभागीय कार्यालयांना पत्रव्यवहार करून त्यांच्या विभागातील महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्यांची दुरुस्ती करून घेण्याचे आदेश दिले आहेत. आता कधीपर्यंत त्याची दुरुस्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.