मुंबईत गारठा वाढला; पारा 16 अंशांवर, सकाळी उशिरापर्यंत थंड वाऱयाचे झोत

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील पारा चांगलाच घसरला आहे. मंगळवारी मुंबईचा किमान पारा 14 अंशापर्यंत घसरला. आज बुधवारी पाऱयात 2 अंशांची वाढ झाली असली तरी बहुतांश ठिकाणी किमान पारा 16 अंश सेल्सियस इतका नोंदवला गेल्याने सकाळी उशिरापर्यंत मुंबईकर थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी पडत असून जागोजागी शेकोटय़ा पेटलेल्या दिसत आहेत.

उत्तरेकडे मोठय़ा प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्यामुळे आणि उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयांमुळे राज्यात अनेक भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. राज्यात अनेक भागांत 9 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी 10 ते 12 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

 

मुंबईतील किमान तापमान

(अंश सेल्सियसमध्ये)

 बोरिवली 16

 चेंबूर 16

 कुलाबा 19k

 मुलुंड 16

l पवई 19

 वरळी 19