कोरोना व्हेरिएंट ‘रंग’ बदलतोय! डब्ल्यूएचओकडून सतर्कतेचा इशारा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘जेएन-1’ सारखा ‘रंग’ बदलत असून वेगाने पसरत आहे. त्यामुळे देखरेख आणि सिक्वेंन्सिंगची प्रणाली बळकट करा, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने आशियातील देशांना दिल्या आहेत. आवश्यक घबरदारी घ्यावी, कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहनही ‘डब्ल्यूएचओ’ने केले आहे.

कोरोनाच्या नव्या ‘जेएन-1’चा संसर्ग काही देशांमध्ये वेगाने वाढत आहे. हिवाळी वातावरण असल्याने प्रसारास गती मिळत असल्याचे आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. शिवाय वर्षअखेर असल्याने सुट्टय़ांच्या काळात लोक मोठय़ा संख्येने गर्दी करण्याचे प्रकार वाढत असल्याने हा धोका आणखी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, लक्षणे असल्यास मास्क वापरावा, चाचणी करावी, पॉझिटिव्ह आल्यास स्वतःला विलग ठेवावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

देशातील सक्रिय रुग्ण – 4054
24 तासांत 315 कोरोनामुक्त
24 तासांत देशात कोरोनाचे नवे 628 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 376 म्हणजे निम्म्याहून अधिक बाधित एकटय़ा केरळमध्ये आढळले असून एकाचा मृत्यू झाला.
केरळनंतर कर्नाटकात 106 तर महाराष्ट्रात 50 रुग्ण आढळले आहेत. देशातील बाधितांमध्ये 63 जणांमध्ये नव्या ‘जेएन-1’ व्हेरिएंटचे 63 रुग्ण आढळले आहेत.