देवगडमध्ये गुरुवारी होणार ‘होऊ द्या चर्चा’! केंद्र सरकारचा खोटारडेपणा उघड करणार

शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवगड कॉलेज नाका येथे गुरुवारी सकाळी 10 वाजता होऊ द्या चर्चा या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी देवगड येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर ,तालुकाप्रमुख जयेश नर रवींद्र जोगल महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे युवा सेनेच्या माध्यमातून सातत्याने रिक्त पदे रुग्णालयातील भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आमदार राणे यांनी रुग्णालयात परिसरात केलेल्या राड्याच्या माध्यमातून आमचे युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांचा हात पकडून अपहरण करण्याचा प्रकार निंदनीय आहे. याचा आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून निषेध करतो देवगडमध्ये होऊ द्या चर्चा या कार्यक्रमातून तालुक्यात भेडसावणाऱ्या समस्या, देवगड मधील कायदा सुव्यवस्था याबाबत होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून उत्तर देणार असून आमदार राणे यांना युवा सेनेने विचारलेल्या दहा प्रश्नांपैकीच ग्रामीण रुग्णालयातील एक समस्या होती. त्याचाच पाठपुरावा आमचे युवा सैनिक करत होते. आमदार राणे यांना विचारलेल्या दहा प्रश्नांची मिरची आमदार नितेश राणे यांना झोबली असल्यामुळे गणेश गावकर सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा हात पकडण्याची वेळ राणे यांच्यावर आली. गणेश गावकर यांचे हात पकडा पाय पकडा अथवा पाया पाडा आता युवा सेना थांबणार नाही. आता तर हा युवासेनेनेच जाब विचारला यापुढे तालुक्यातील जनता तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला.

युवा सेनेच्या माध्यमातून विचारलेले 10 प्रश्न आमदार राणे यांना सुटणार नाही. उत्तर देणे ऐवजी फलकाच्या माध्यमातून 2200 कोटींचा निधी आणला असे फलकातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील कोकण पॅकेज असे फलक लावण्यात आले होते. अशाच पद्धतीने घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतर जनतेने त्यांचा पराभव केला होता याच प्रकारचे बॅनर आज आमदार नितेश राणे यांनी तालुक्यात ठीक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावेळी जो प्रकार फलकाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत घडला तोच प्रकार आमदार नितेश राणे यांच्याबाबत घडणार असून आमदार नितेश राणे यांनी फलकाच्या माध्यमातून खोटी आश्वासने दिली आहेत मतदार संघात 2200 कोटी चा विकास निधी आणला एवढा निधी तुम्ही आणला असाल तालुक्याचे सर्व प्रश्न मार्गी लागले असते धादांत खोटे बोलण्याचा प्रकार आमदार नितेश राणे फलकाच्या माध्यमातून करीत आहे जनता या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे देखील यावेळी सुशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.