अदानी हटाव, धारावी बचावचा नारा झाला बुलंद, ऑगस्ट क्रांतिदिनी धारावीकरांची एकजूट

राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लादलेल्या अदानी समूहाविरोधात आज ऑगस्ट क्रांतीदिनी 50 हजारांहून अधिक धारावीकरांनी वज्रमूठ आवळून अदानी हटाव, धारावी बचावचा नारा बुलंद केला. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चले जाव म्हणत या देशाबाहेर पिटाळून लावले त्याचप्रमाणे सक्तीने लादलेल्या अदानीला धारावीतून पळवून लावू, असा निर्धार आज झालेल्या सर्वपक्षीय धारावी बचाव आंदोलनाच्या सभेत धारावीकरांनी बोलून दाखवला. यावेळी शिवसेनेसह 12 राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, 200 हून अधिक संघटना, विविध मंडळांतील पदाधिकाऱयांनी धारावीकरांना मार्गदर्शन केले.

सरकारने धारावीकरांवर लादलेल्या अदानी समूहाला हटवावे, या मागणीसाठी धारावीकर आज रस्त्यांवर उतरले. एन. शिवराज मैदानात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख महेश सावंत, उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर, सीपीआयचे नसरुल हक, वसंत खंदारे, सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, बसपाचे श्यामलाल जैसवार, सपाचे आमदार अबू आझमी, अशपाक खान, एमआयएमचे मुनावर अली, आम आदमी पक्षाचे संदीप कटके, आरपीआयचे सिद्धार्थ कासारे, शेतकरी कामगार पक्षाचे राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंबी पेरियार, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष युनूस शेख, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गुप्ता, जनजागृती भाडेकरू महासंघाचे अनिल कासारे, नितीन दिवेकर, काँग्रेसचे शिवलिंग व्हटकर, जनता दल युनाइटेडचे सचिन बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे सुनील कांबळे, मनसेचे संदीप कवडे, आरजेडीचे कमरे आलम, विधानसभा संघटक विठ्ठल पवार, माजी नगरसेवक वसंत नकाशे, टी. एम. जगदीश, हर्षला मोरे, राजू सूर्यवंशी, रामकृष्ण केणी, विभाग संघटिका कविता जाधव, माजी नगरसेविका श्रद्धा जाधव, मारियूमाल मुततू तेवर, माजी शाखाप्रमुख दिलीप कटके, उपविभाग संघटक माया जाधव, देवयानी कोळी, उपविभाग समन्वयक कविता विश्वकर्मा, उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर, महादेव शिंदे, जोसेफ कोळी, उपविभाग समन्वयक गणेश खाडे, गंगा देरबेर, जावेद खान, शाखाप्रमुख सतीश कटके, आनंद भोसले, सुरेश जाधव, किरण काळे, भास्कर पिल्ले, मुत्तू पट्टन, बाबासाहेब सोनावणे, संपर्कप्रमुख प्रमोद माने, युवासेना समन्वयक रोहित खैरे, युवासेना विभाग युवा अधिकारी सनी शिंदे, नितीन सातपुते, मारिभाई अंजुमभाई, नितीन भालेराव, सिद्धार्थ मेढे, धनसुख परमार, बाळासाहेब शिनगारे, जगन्नाथ खाडे तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

धारावीकरांच्या प्रमुख मागण्या

धारावीतच 405 चौरस फुटांचे मोफत घर, नवीन सर्वेक्षण करा, पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन लोकांसाठी प्रसिद्ध करावा, टाटा पॉवरनगर, राजीव गांधीनगर, प्रेमनगर येथील झोपडपट्टीचा प्रकल्पात समावेश केला जावा आणि धारावीतच प्रकल्पाअंतर्गत मोफत घरे देण्यात यावी, लघुउद्योगासाठी आराखडा प्रकाशित करण्यात यावा त्यामध्ये चामडे, वस्त्र, प्लॅस्टिक, मातीची भांडी इत्यादी सर्व उद्योग असावेत, भाडेकरूंचे भाडे तत्त्वावर पुनर्वसन करण्यात यावे, निवासी सोसायटय़ांना कॉर्पस फंड द्यावा, खासगी जमीन मालकांना रास्त भाव द्यावा, पुंभारवाडा आणि धारावी कोळीवाडय़ातील रहिवाशांना विशेष तरतुदीसह विकासासाठी विचारात घ्यावे, प्रकल्पाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, व्यावसायिक गाळे आणि कारखान्यांचे पुनर्वसन करावे.